WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

धक्कादायक, अकरा दिवसापासुन बेपत्ता असलेल्या तरुणाचा पत्ताच नाही,

Image

पत्नी व परिवारात चिंतेचे सावट,19 मार्चला वणी पोलीसात केली होती तक्रार , पोलीस आहे कोरेनाच्या बंदोबस्तात

वणी : ता.प्र संघर्ष भगत-यवतमाळ

मो.8379995591

वणी पोलीस स्टेशन हद्दीत येणार्या केसुर्ली येथिल एक 35 वर्षिय तरुण अकरा दिवसापासुन बेपत्ता असल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

शंकर तात्याजी उरकुडे(35) रा.केसुर्ली ता.वणी असे बेपत्ता ईसमाचे नाव आहे.

शंकरला दोन मुले असुन एक 6 वर्षाचा तर दुसरा 3 वर्षाचा आहे. तसेच पत्नी माधुरी ,आई तानीबाई व वडील असा परिवार आहे. दि.10 मार्च रोजी रंगपंचमी च्या दिवशी शंकरचा मोठा मुलगा लोकेश(6) याला अचानक ताप आला.दोन तिन दिवस झाले परंतु ताप काही उतरेना म्हणुन त्याला वणी येथिल ग्रामिण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. परंतु लोकेशचा ताप उतरत नव्हता. परिणामी लोकेशला चंद्रपुर येथिल रुग्णालयात भर्ती केले परंतु तेथेही काही लोकेशच्या प्रक्रुतीत सुधारना झाली नाही. परिणामी दि.12 मार्च ला सेवाग्राम येेथिल कस्तुरबा हाँस्पिटल येथे लोकेशला भर्ती केले. दोन तीन दिवस झाले परंतु तेथेही लोकेशची प्रक्रुतीत सुधारना होत नव्हती,अशातच उपचारा दरम्यान लोकेशने दि.15 मार्च ला अखेरचा स्वास घेतला.आणी सुखी परिवारात दु:खाचे डोंगर कोसळले. या घटनेचा शंकरच्या मनावर मोठा धक्का बसला कारण मोठा मुलगा लोकेश हा वडील शंकरचा जिव होता तो वडीलासोबतच नेहमी असायचा. परिणामी वडील शंकरच्या मनावर फार मोठा आघात झाला.तेव्हापासुन शंकर वेडा झाल्यासारखा वागु लागला. परिणामी शंकरच्या आईने त्याला दि.16 मार्च रोजी वणी येथिल दत्त मंदीरात नेले होते.त्या राञी शंकर आणी त्याची आई तानेबाई हे दोघेही त्या मंदीरातच झोपले. दुसर्या दिवशी दि.17 मार्चला शंकरची पत्नी माधुरी हि सकाळी 11:30 वाजता पती शंकरचे कपडे घेवुन दत्त मंदीरात आली असता पती शंकर मंदीरात असल्याचे आढळले नाही. याबाबत सोबत असलेल्या सासुला विचारणा केली असता पती शंकर सकाळी 9 वाजता दुध घेवुन येतो म्हणुन मंदिरा बाहेर गेला परंतु अजुन पर्यंत वापस आलाच नाही. असे कळताच माधुरीने मंदिर परिसरात पतीचा शोध घेणे सुरु केले परंतु त्याचा पत्ता काही लागत नव्हता. त्यानंतर नातेवाईकांकडे फोनद्वारे माहिती घेतली परंतु शंकरचा पत्ता लागला नाही.परिणामी गावात केसुर्ली येथे जावुन शोधाशोध केली दोन दिवस झाले परंतु शंकरचा कुठेच थांग पत्ता लागला नाही. परिणामी शंकरची पत्नी माधुरी हिने दि.19 मार्चला वणी पोलीस स्टेशन गाठुन पती शंकर तात्याजी उरकुडे (35)हा बेपत्या असल्याची तक्रार दिली.

विशेष म्हणजे 11 दिवस होवुनसुद्धा पती शंकर चा पत्ता न लागल्यामुळे पत्नी माधुरी हिने वणी पोलीसांना पती बाबत विचारणा केली असता पोलीसांनी 'कोरोना' च्या बंदोबस्तात असल्याचे सांगीतले. यामुळे पत्नी माधुरी चांगलीच चिंतेत अाहे कारण तिला एक तिन वर्षाचा बाळ असुन वयोव्रुद्ध सासरा आहे तर सासु दत्त मंदीरात राहते.अशापरिस्थितीत मदत मागायची तरी कोणाकडे?अशी चिंता शंकरची पत्नी माधुरीला पडली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share