WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

नियमांचे उल्लंघन करणार्या दुचाकीस्वारांच्या 56 दुचाकी जप्त,

Image

विनाकारण गावभर फिरणार्यांच्या , दुचाक्या होणार जप्त:- ठाणेदार वैभव जाधव

नागरीकांनी आपआपल्या परिसरातुनच जिवनावश्यक वस्तुंची खरेदी करावी ,गरज नसल्यास दुचाकीचा वापर टाळावा - ठाणेदार वैभव जाधव

वणी शहर प्रतिनिधी:- निलेश चौधरी

शहरात संपुर्ण संचारबंदी लागु असतांना, येथिल क्रुषि उत्पन्न बाजार समिती मध्ये तसेच आठवडी बाजार या ठिकाणी लोकांनी तोबा गर्दी केल्याने, प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती. परिणामी पोलीसांनी घटनास्थळी जावुन नागरीकांना शिस्तिचे डोज पाजले.

आज येथिल क्रुषि उत्पन्न बाजार समितीत सकाळी भाजी विक्रेत्यांनी चांगलीच गर्दी केली. तसेच रविवार आठवडी बाजारात सुद्धा लोकांनी मोठी गर्दी केली होती.परिणामी संचारबंदीच्या आदेशाची जणु या ठिकाणी पायमल्लीच झाल्याचे चित्रि दिसुन आले.

या घटनेची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक व ठाणेदार वैभव जाधव यांना माहिती मिळताच... ते पथकासह घटनास्थळी पोहचले व गर्दी केलेल्या नागरीकांना शिस्तीचे पालन करण्याच्या सुचना दिल्या. त्यानंतर नगर पालिकेचे मुख्यधिकारी संदीप बोरकर,बाजार समितीचे सचिव झाडे व संबंधित अधिकार्यांनी या बाबत उपाययोजना म्हणुन ,आणी गर्दी होणार नाही. या दृष्टीने भाजी विक्रेतांना बाजार समितीतील गाळे देण्याचा निर्णय घेण्यात आला.

तसेच येथिल आठवडी बाजारात सुद्धा लोकांनी तोबा गर्दी केली होती .तेथे कोंबडी,मांस,मच्छी या दुकानांवर सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी दिसुन आली. त्यामुळे सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाल्याचे लक्षात येताच ,ठाणेदार वैभव जाधव यांनी कार्यवाहीचा बडगा उगारताच ,दुचाकी स्वार वठणीवर आले. शहरामध्ये

अनेक दुचाकीस्वार विविध कारणे सांगुन नियमांचे उल्लंघन करित असतांना आढळले.

त्यामुळे त्यांचेवर वणी पोलीसांनी कारवाईचा करत वाहने जप्त केली.

शहरात संपुर्ण बाजार पेठ बंद असल्याने सर्वञ संचार बंदीचे काटेकोरपने पालन करतांना दिसत असुन शहरातील प्रत्येक चौकात चार भाजीपाल्याचे दुकान लावण्याची परवानगी दिली आहेत. तसेच प्रत्येक भागात जिवनावश्यक वस्तुंचे दुकाने उपलब्द आहेत. परंतु युवा वर्ग बिनकामी शहरात फिरतांना आढळुन आले असुन ते नियमांचे उल्लंघन करित असल्याने पोलीसांच्या डोक्याला चांगलाच ताप वाढल्याचे दिसून येते. त्यामुळे सायंकाळी टिळक चौक, मुख्य बाजार,दिपक चौपाटी ईत्यादी ठिकाणी बिनकामी फिरणार्यांच्या व असमाधानकारक उत्तर देणार्यांच्या 56 दुचाकी जप्त करण्यात आल्या,

विशेष म्हणजे जप्त करण्यात आलेल्या दुचाकी 15 एप्रिल ला परत मिळणार असल्याची माहिती आहे. या कारवाईमुळे रिकामटेक दुचाकीस्वारांचे चांगलेच धाबे दनानले आहे.

नागरीकांनी आपआपल्या परिसरातुनच जिवनावश्यक वस्तुंची खरेदी करावी व शहरात बिनकामी दुचाकीने फिरुनये ,कुठल्याही गरजुला ,किंवा वृद्धाला कुठल्याही प्रकारची मदत लागल्यास ,त्यांनी वणी पोलिस स्टेशनसी संपर्क साधावा असे प्रतिपादन ठाणेदार वैभव जाधव यांनी केले.

शहरातील विविध भागात भाजीपाला दुकाने लावण्यात आली असुन जिवनावश्यक वस्तुंचे दुकाने सुद्धा आहेत. त्यामुळे दुचाकीची गरज नसल्यास ,शक्यतो पायदळ जाऊन खरेदी करावी.अशी निर्वाणीची विनंती ठाणेदार वैभव जाधव यांनी केली. तरी सुद्धा काही दुचाकीस्वार बिनकामी शहरात फिरतांना आढळत असल्याचे चित्र डोळ्यासमोर येताच कार्यवाहीचा बडगा पोलिस प्रशासनाने उभारण्यात आला. परिणामी त्यांचेवर आदेशानुसार कारवाई करावी लागत आहे. आपल्या कुटुंबांची काळजी घ्यावी आणी ही सक्ती जनतेच्या भल्यासाठी आहे .त्यामुळे सर्वांनी प्रामाणिकपणे सहकार्य करावे असे आवाहन ठाणेदार वैभव जाधव यांनी नागरीकांना केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share