WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

जैताई देवस्थानाची मुख्यमंत्री सहायता निधीत 21 हजाराची मदत.....

Image

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदतीचा हाथ :- अन्नदान देण्याचा ऊपक्रम सुद्धा सुरू ......

वणी :- सुरज चाटे, जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ

कोरोना या विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे ओढवलेल्या भीषण संकटाशी मुकाबला करण्यासाठी आर्थिक सहाय्यार्थ केलेल्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील जैताई देवस्थानने आपल्या सामाजिक जाणिवेचा प्रत्यय देत मुख्यमंत्री सहायता निधी कोविड 19 साठी 21000 रूपये देणगी दाखल दिले आहेत. सदर्हू रकमेचा धनादेश नुकताच मंदिराचे अध्यक्ष नरेंद्र नगरवाला , सचिव माधव सरपटवार व संचालक मुन्नालाल तुगनायत ह्यांनी येथील उप विभागीय अधिकारी जावळे यांच्या स्वाधीन केला.

उल्लेखनीय बाब म्हणजे संचारबंदीच्या 21 दिवसांच्या काळात मंदिराच्या अंतर्गत अन्नछत्र समितीने गावात फिरून निराधारांना अन्नदान देण्याचा ऊपक्रम सुरू केला आहे. मुन्ना पोद्दार , मुलचंद जोशी , दिवाण फेरवाणी , गुलाब खुसपुरे , नामदेव पारखी , मयुर गोयनका , समीर लाभसेटवार , सुरेश मांडवकर , प्रशांत

महाजन , राजा जयस्वाल , नामदेव खामनकर इत्यादी हे कार्य सिध्दीला नेण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share