WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

बसस्थानक चौकातील फुटलेल्या पाईप लाईन चे काम बंद...धोकादायक खड्याने अपघाताची शक्यता....

Image

कुठल्याही दिशादर्शकाचा, किंवा सुचना फलकाचा वापर नाही, खड्यामुळे नागरिकांचा जिव धोक्यात

वणी शहर प्रतिनिधी:- निलेश चौधरी

शहरातील बस स्थानक चौकासमोर पाण्याची पाईप लाईन फुटल्याने नगरपरिषद च्या वतीने दुरुस्ती करण्याचे काम संथ गतीने सुरू आहे. शहरात उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईचा सामना वणीकरांना करावा लागतो. पाईपलाईन फुटल्याने दुरुस्ती साठी खड्डा खोदण्यात आला, मात्र खड्डा इतका मोठा आहे की, त्यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात बळावली आहे. शहराच्या मुख्य मार्गावर काम चालू असताना, कुठल्याही प्रकारच्या दिशा दर्शकाची ,किंवा बॅरिकेटची व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे या जिवघेण्या खड्यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात बळावली आहे.

हा वणी नगरपालिका चा निष्काळजी म्हणावे की काय ?? असा सवाल नागरिकांना पडला आहे.

त्यामुळे नगरपालिकेने याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन , त्या जिवघेण्या खड्याजवळ ,दिशादर्शक व सुचना फलकाची उपाययोजना करावी . अन्यथा एखादा मोठा अनुचित प्रकार घडण्यास वेळ लागणार नाही. असे नागरीकांन मधुन बोलले जात आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share