WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

संचारबंदीमध्ये टिडीआरएफ कडून गरजुंना भोजन सेवा.....

Image

सागर मुने, वणी

जागतिक स्तरावर निर्माण झलेली भयावह परिस्थिती पाहता कोरोनाव्हायरस या आपत्ती सोबत डॉक्टर,पोलीस सफाई कामगार,प्रशासकीय अधिकारी राजकीय लोकं अम्ब्युलस सेवा देणारे ड्रायव्हर सर्व आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना विरुद्ध लढा देत आहे. अशा परिस्थितीत टीडीआरएफ अर्थातच टार्गेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स चे जवान यांनी सुद्धा आता मदतीचा हाथ सरसावला असून ते सुद्धा गरजूंना भोजन व अल्पोआहार अशा प्रकारे मदतीला धावून जात आहे.

रस्त्यावर उतरून गरजूंना चहा नाश्ता व जेवन पोचवण्याचे काम टिडीआरएफ जवान करीत आहेत. संचालक टिडी आरएफ हरीश्चंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात हा उपक्रम व मदतकार्य अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात व प्रत्येक खेडे गावात चालू आहे व त्यामध्ये टीडीआरएफ चे सर्व जवान कार्य करीत आहेत.अभिषेक राजहंस हे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. संकटकाळी धावून जाणे हे टिडीआरएफ चे पहिले तत्त्व आहे. टिडीआरएफ सतत 14 वर्षापासून आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत आहे.मागील १४ वर्षापासून अंतराष्ट्रीय,राष्ट्रीय स्तरावर व देशात केव्हाही कोठेही आपत्ती आल्यास नागरिकांच्या मदतीसाठी टिडीआरएफ सतत कार्यरत असते. वणी तालुक्यात कार्यरत असणाऱ्या मुस्कान सय्यद, काजल वाळके, संजना अडकीने, अस्मिता वाळके, जोस्ना कावरकर, नीलिमा कडुकर, अश्विनी अडकीने, रोशन निकड़े, अश्विनी धानडे, पियुष अडकीने, रविना कवरासे, सुमित तुरणकर आदी टिडीआरएफ जवान अक्षरशः युद्ध स्तरावर गरजूंना चहा,नाश्ता,बिस्कीट,पाण्याची व्यवस्था करीत आहेत सोबतच संचारबंदीमुळे अडकलेल्या परीवारांना व मजूरांना जेवनाची सोय सुद्धा करित आहे. हे जवान येथेच थांबले नाहीतर संचारबंदी मुळे ज्याच्या घरात चूल पेटनार नाही अशा लोकांचा शोध घेऊन त्यांच्या घरात टिफीन देवून अन्न पुरवठा करण्याचं ही काम टिडीआरएफ जवान करत आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share