WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

विजेच्या धक्क्याने बैल ठार, शेतकरी दुखावला: गावकर्‍यांनी केली नुकसान भरपाईची मागणी

Image

प्रतिनिधी/ योगेश मडावी झरी

झरी- तालुक्यातील माथार्जुन येथील एका शेतकऱ्याचा बैल विजेच्या धक्क्याने दगावला आहे.

मृत पावलेल्या बैल मालकाचे मारोती संभा आडे असे नाव असून या बाबीबाबत पाटण पोलीस स्टेशन ला माहिती देण्यात आली असे सूत्रांनी सांगितले.

आज दिनांक 1 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास नेहमी प्रमाणे बैल चरण्यास गेला असता माथार्जुन शेत शिवारातील कुंडलिक धुर्वे यांच्या शेतात जिवंत विद्युत तारा पडलेल्या होत्या, त्याला आडे यांच्या मालकीच्या बैलाचा स्पर्श झाला. त्यात जवळपास पन्नास हजार किमतीचा बैल अखेर ठार झाला आहे. यामुळे आता बळीराजा संकटात सापडला आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुजरासह शेतकरी अडचणीत सापडला असून त्यात बैल दगावला त्यामुळे आणखीच बळीराजा दुखावला आहेत.

शेतकऱ्यांची अडचण आणि शेतीचे गांभीर्य लक्षात घेता, पाटण पोलीस ठाण्यातील जमादार अभिमान आडे साहेब व रमेश मेश्राम साहेब यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. बैल मालक मारोती झाडे यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी माथार्जुन'कर यांनी मागणी केली आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share