WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

आबालवृद्धांना मदत करतांना, खाकी वर्दीतील देवमाणुस

Image

कामानिमित्त बाहेर पडणार्या व्यक्तींना पोलिसांकडून मास्क वाटप

वणी शहर प्रतिनिधी:- निलेश चौधरी

सध्या जगभरात सर्वत्र कोरोना वायरस मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत असतांना, जनतेला सुरक्षित ठेवण्याचा भार ,हा आरोग्य विभाग व पोलिस प्रशासनाच्या खांद्यावर मोठ्या प्रमाणात आला आहे. कोरोना सारख्या संकटातून आपला बचाव झाला पाहिजे म्हणून, पोलिस प्रशासन दिवसाची रात्र करतांना पहावयास मिळत आहे. परंतू ईतके करुन सुध्दा, 20% जनता टवाळखोरपणा करुन ,नियमाची पायमल्ली करतांना सुध्दा दिसत आहे. अशा नियमाचे उल्लंघन करणार्यावर लोकांना, बाजीरावचा धाक सुध्दा कधी कधी दाखविला जातो. त्यामुळे पोलिस स्टेशन किंवा पोलिस म्हटले तर ,सामन्याचा मनात शहारा निर्माण होतो . परंतू आजचा दिवस काहीसा वेगळा ठरला.

कारण खाकी वर्दीतील देवमाणसाचे खर्या अर्थाने दर्शन झाले. ठाणेदार वैभव जाधव यांनी स्व:खर्चातुन, शहरातील जे वृद्धांना कामा निमित्त बाहेर निघाले त्यांना मास्कचे वाटप करण्यात आले .आणी (कोविड19) संदर्भात जनजागृती करण्यात आली.यावेळी शहरातील शिवाजी चौक, बसस्थानक चौक ,साई मंदिर चौक, आंबेडकर चौक,सावरकर चौक , भगतसिंग चौक, दिपक टाॅकीज परिसर ,तसेच इतरही परिसरात ,3000 मास्कचे वाटप करण्यात आले. आणी जनसामान्यांत कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली.

प्रत्येकांनी दिलेल्या वेळेतच ,काम असल्यास बाहेर पडावे .आवश्यकता नसल्यास ,दुचाकीने फिरणे टाळावे .आपल्या जवळील दुकानातून खरेदी करावी .आणी कुठल्याही गरजुला मदत लागल्यास, प्रशासनाशी संपर्क साधावा. प्रत्येकांची मदत योग्य पध्दतीने केली जाईल.

आणी दिलेल्या वेळेच्या नंतर कुठलाही व्यक्ती नाहक फिरताना दिसल्यास त्याच्यावर कठोर ,दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.

नियमाचे पालन करणार्यास फुलांचा हार ,आणी नियमाची पायमल्ली करणार्यांवर , दांडुचा मार ....! देण्यात येईल असे ठाणेदार वैभव जाधव यांनी देशोन्नतीशी बोलतांना सांगितले

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share