WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

यवतमाळ अर्बन बँकेच्या वणी विभागाच्या पाच शाखेत आर्णी शाखेतील कर्मचारी मंगेश देशकर ह्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली !

Image

प्रतिनिधी / प्रसाद नावलेकर

यवतमाल अर्बन को आँपरेटिव्ह बँक,आर्णि शाखेचे कर्मचारी मंगेश श्रीधरराव देशकर यांचे दि २१ मार्च २०२० शनिवारला मिडास हाँस्पीटल नागपूर येथे वयाचे ४३ वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचेवर वडगाव मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मन मिळाऊ,हसतमुख व सह्दयी असणारे मंगेश देशकर हे उच्च विद्याविभुषित होते. त्यांनी एम.ए,बीपीएड,बीएड,एम एड,एम.एस.डब्लू पर्यंत शिक्षण पूर्ण केले होते.ज्योतीष्यशास्त्राचा व वैदिक गणिताचा विशेष अभ्यास असणारे मंगेश देशकर हे चांगले वक्ता होते ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय वर्ष संघ शिक्षित स्वयंसेवक होते.त्यांनी बालाजी शाखेचे मुख्य शिक्षक म्हणून काम पाहिले. बँकेच्या ग्राहक वर्गात व कर्मचारी वर्गात ते अतिलोकप्रिय होते. त्यांचे मागे दोन भाऊ व आई आहे. वणी,हीगणघाट,भद्रावती ,चंद्रपूर, गढचांदूर शाखेत सर्व कर्मचाऱ्यांनी आज दुपारी श्रध्दांजली वाहीली !वणी विभागाचे अध्यक्ष प्रशांतजी माधमशेट्टीवार ह्यांचे निदर्शनानुसार श्रद्धांजली वाहण्यात आली !

अशी माहीती बँके अधिकारी प्रसाद नावलेकर ह्यांनी दिली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.