WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी पोलीस स्टेशन मध्ये 127 जनांनी केले रक्तदान

Image

वणी शहर प्रतिनिधी:- निलेश चौधरी

कोरोना विषाणु (कोविड19) चा वाढत चाललेला प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने रक्तदान शिबिरे आयोजित करुन रक्त संकलन करण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभुमिवर जिल्हा पोलीस अधिक्षक मा. एम.राजकुमार व अपर पोलीस अधिक्षक मा.नुरुल हसन यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक , पोलीस निरिक्षक वैभव जाधव वणी, यांचे पुढाकारात, आज दि.7 एप्रिल मंगळवारी वणी पोलीस ठाण्याच्या दक्षता भवन मध्ये,सोशल डिस्टंसिंग ठेवुन नागपुर येथिल लाईफ लाईन रक्त पेढी या संस्थेच्या माध्यमातुन रक्तदान करण्यात आले.

या शिबिरात 7 पोलीस अधिकारी व 40 पोलीस कर्मचार्यांनी रक्तदान केले. त्यासोबतच वणी शहरातील प्रतिष्ठीत 80 नागरीकांनी स्वखुषिने रक्तदान शिबीरास हातभार लावला. सुरुवातीला 100 जन रक्तदान करतील असे नियोजन करण्यात आले होते. माञ अखेरपर्यंत 127 लोकांनी रक्तदान करुन शिबिरास यशस्विरित्या पार पाडले.

या शिबिराकरिता वणी येथिल डाँ अर्शद शाह,डाँ सैयद आतिक यांचे विशेष सहकार्य लाभले.

रक्तदान शिबीराचे यशस्वीतेसाठी मा.सुशिलकुमार नायक पोलीस उपविभागीय अधिकारी वणी, ठाणेदार वैभव जाधव ,नापोकाँ ईकबाल शेख, विजय वानखेडे, प्रदिप ठाकरे, रवि ईसनकर,आशिष टेकाडे,सदाशिव मेघावत यांनी परिश्रम घेतले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share