WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

जीवनावश्यक सेवा देणा-यांना विमा लागु करा... राकेश खुराणा...

Image

व्यापारी असोसिएशन कडून मुख्यमंत्री यांना निवेदन....

वणी :- सुरज चाटे, जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ

सध्या संसर्ग जन्य कोरोना वायरसने आपले थैमान घातले असून शासनाने डॉक्टर, पोलीस सेवा देणारे यांचा विमा केला असून जीवनावश्यक सेवा देणारे किराणा, मेडिकल, दूध, भाजीपाला व फळे यांना सुद्धा विमा लागू करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे दिनांक 13 ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे यांना उपविभागीय अधिकारी वणी यांच्या मार्फत पाठवून मागणी केली आहे.

सद्या जगभरात कोरोना संसर्गजन्य रोगाची लागन मोठया प्रमाणावर सुरू असुन दिवसागणिक संसर्ग वाढत असल्याचे लक्षात येत आहे. जिवनावष्यक सेवा देणारे व्यापारी व चिल्लर दुकानदार यांच्या सुरक्षिततेच्या दृश्टिने त्यांच्या परिवाराची परिस्थिती लक्षात घेता आपल्या जिवाची परवाह न करता सदर काळात सेवा देत आहे.

त्यामुळे अषा जीवनावश्यक सेवा देणारे किराणा, मेडिकल, दूध, भाजीपाला व फळे यांना शासनाकडून त्यांच्या सुरक्षिततेच्या दृश्टीने पाउुल उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. तरी सदर विमा तातडीने लागु करून जिवनावष्यक वस्तुं पुरविणा-यांवर योग्य ते विमा लागु करून त्यांच्या हिताच्या दृश्टिने निर्णय घ्यावा अशा मागणीचे निवेदन दिनांक 13 ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे यांना उपविभागीय अधिकारी वणी यांच्या मार्फत पाठवून मागणी केली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share