WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

अ‍ॅमेझॉन करणार ७५ हजार जणांची भरती

Image

जगभरात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. करोना व्हायरसमुळे जगभरात १८ लाखांपेक्षा जास्त लोकांना करोनाची बाधा झाली आहे तर एक लाखांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. या महामारीमुळे जगासमोर आर्थिक मंदीचे सावट उभे राहिले असून अनेकांच्या नोकऱ्या जात आहेत. अशा कठीण परिस्थितीमध्ये ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन तब्बल ७५ हजार जणांना नोकरीची संधी देणार आहे.

या जागा वेअरहाउस स्टाफ पासून डिलिव्हरी ड्रायवर्स या पदांपपर्यंत असणार आहेत. लॉकडाउनमुळे ७५ हजार जणांची भरती केली जाणार असल्याचं कंपनीनं सांगितलं आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, लॉकडाउनमुळे अमेरिकेत सर्वजण घरातच आहेत त्यामुळे ऑलनाइन ऑर्डर वाढल्या आहेत. अनेक दिवसांपासून क्वारंटाइन असल्यामुळे किराणा दुकानेही खाली होत चालली आहेत. त्यामुळे कंपीन खाद्यपदार्थांसह आरोग्याशी निगडीत सामना लोकांपर्यंत पोहचवण्याचा विचार कंपनी करत आहे. त्यामुळे अतिरिक्त स्टाफ वाढवला जातोय. वाढत्या बेरोजगारीला पाहून अमेझॉनने नवीन कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी प्रतितास वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share