WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कामगार नेते तथा माजी खासदार मा.श्री नरेशबाबूजी पुगलिया यांच्या मार्गदर्शनाखाली अल्ट्राटेक सिमेंट आवारपूर कामगारातर्फे मुख्यमंत्री सहायता (कोविड-१९) ला १० लाखांची मदत

Image

संघर्ष भगत कोरपना :-

चंद्रपूर(दिनांक १६ एप्रिल २०२०)अख्खा

संपूर्ण जगात आपल्या देशात महाराष्ट्रात कोरोनाचा विषाणूमुळे परिस्थितीचा सामना करण्यासाठी कामगार नेते तथा माजी खासदार मा.श्री नरेशबाबूजी पुगलिया यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अल्ट्राटेक सिमेंट, आवारपूर तालुका कोरपना, जिल्हा चंद्रपूर येथील कामगारांनी आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधी (कोविड-१९) ला देण्याचे ठरविले . त्यानुसार आज दिनांक १६ एप्रिल २०२० रोजी कामगार नेते श्री नरेशबाबूजी पुगलिया यांच्या मार्गदर्शनाखाली अल्ट्राटेक कामगार संघटना तर्फे सर्व ( स्थायी,अस्थायी व ठेकेदारी ) कामगारांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये रु १०,०१४०७/-(दहा लाख एक हजार चारशे सात फक्त) चा धनादेश मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्या सुपूर्द करण्यात आला.

यावेळी युनियनचे कार्यकारी अध्यक्ष तथा जिल्हापरिषद सदस्य श्री शिवचंद काळे, महासचिव श्री साईनाथ बुचे, एसीसी सिमेंट कामगार संघटनेचे महासचिव श्री देवेंद्र गेहलोद, काँग्रेसचे अँड. अविनाश ठावरी, चंद्रपूर मनपा नगरसेवक श्री अशोक नागपुरे, नगरसेवक श्री देवेंद्र बेले व युनियन चे इतर पदाधिकारी उपस्थित होते,

तसेच यापूर्वी देखील मा.नरेशबाबुजी पुगलिया यांच्या मार्गदर्शनात मुख्यमंत्री सहाय्यता निधी (कोविड-१९) मध्ये जवळपास ४५ लाखांची मदत करण्यात आली आहे,

यापुढेही येत्या काही दिवसात प्रतिष्ठी उधोगातील अनेक कामगार संघटना मार्फत मा. नरेशबाबूजी पुगलिया यांच्या आवाहनानुसार मदत करण्यात येणार आहे.या दरम्यान अधिक अभिनंदन होत असल्याचे समजते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share