WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

अवैध वाळु तस्करांना आशिर्वाद तरी कोणाचे ?

Image

▶️सर्रासपणे वाळुची वाहतुक/पुन्हा ट्रॅक्टर CCTV कैद,मैत्रीपुर्ण संबंधांमुळे दुर्लक्षांचे आरोप.

प्रतिनिधी-संघर्ष भगत

मो.8379995591

लाखोचा महसूल पाण्यात बुडविले जात आहे

कोरपना :- देशात कोरोनाच्या" पार्श्वभूमीवर सध्या संचारबंदी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.यामूळे सगळीकडे स्मशान शांतता पसरली असून अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी वाहनांची अॉनलाईन नोंदणी करून परवानगी देण्यात येत आहे. परवानगीचे लेटर वाहनांवर चिकटवून वाहतुक होत नाही.असे असताना मात्र कोरपना तालुक्यात आवारपूर मार्गे ट्रॅक्टरद्वारे रात्रंदिवस मोठ्याप्रमाणात वाळु तस्करी होत आहे.इतर वाहनांसह यांनाही शासनाने रेती तस्करीसाठी अॉनलाईन परवानगी तर दिली नाही ना अशी शंका सर्वसामान्य नागरिक व्यक्त करताना दिसत आहे.इकडे जिल्हाबंदी असतानाही यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील वाळु चंद्रपूर जिल्ह्याच्या कोरपना तालुक्यातील नांदाफाटा व तालुक्यात इतर ठिकाणी सर्रासपणे घरपोच केली जात आहे.ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळुची वाहतुक होत असल्याची व्हिडिओ क्लिप वारंवार दाखवून सुद्धा संबंधितांकडून कारवाई करण्यात येत नसल्याने संबंधितांंचे रेती तस्करांसोबत पुर्णपणे मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे फलित असल्याचे आरोप होत आहे.संचारबंदी लॉकडाऊनचे उल्लंघन करणार्‍या विरूद्ध पोलिसांनी मोहिम उघडली असून शहरात बाहेरून येणारे तसेच शहरातील विनाकारण फिरत असलेल्यांना मज्जाव करण्यात येत आहे.प्रत्येक वाहनांची कसून तपासणी व लोकांची चौकशी केली जात आहे.या लॉकडाउनमुळे सर्वसाधारण नागरिकांचे बाहेर निघणे जिकरेचे झाले असतानाच चक्क वाळु भरलेले ट्रॅक्टरची बिनधास्तपणे वाहतूक कशी हा मात्र संशोधनाचा विषय बनला आहे.तालुक्यातील काही घाट व नदीपात्रातून वाळु उपसा तर होतच आहे यासोबतच वणी तालुक्यातून वाळुमध्ये लपवून अवैध दारू सुद्धा आणली जात असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अख्खा देश विनाशाच्या उंबरठ्यावर उभा असताना लॉकडाऊनच्या नावाखाली वाळु व अवैध दारू तस्करांना सुगीचे दिवस आले आहे.पुर्वी प्रमाणेच ट्रॅक्टरद्वारे रेती नेत असल्याचे चित्र 15,16 एप्रिल रोजी सुद्धा CCTV कॅमेरात कैद आहे.स्थानिक महसुल विभाग व पोलिस प्रशासनाने यावर अंकुश लागावा अशी मागणी वारंवार होत आहे मात्र कारवाईच होत नसल्याने अनेक शंकाकुशंका निर्माण झाल्या आहे.जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांनी याकडे जातीने लक्ष देऊन याठिकाणी सुरू असलेला हा प्रकार थांबवावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

CCTV व्हिडिओ क्लिप.सोबत आहे .अनथा हा सावळा गोधंळ न आवरल्यास इकडे या अवैध वाळूच्या उपसा होत असल्यामुळे फुटच लाखोचा मसूलबुळत आहे .

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share