WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी येथील गुरूनगर येथील रहिवाशी असलेल्या गंगाधर नानाजी मिलमिले या शेतक-याने मुख्यमंत्री सहायता निधीला 51 हजारांची मदत केली. सोमवारी 13 एप्रिल रोजी त्यांनी वणीचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांना 51 हजारांचा चेक सुपुर्द केला.

Image

सध्या कोरोनामुळे देशावर मोठे संकट आले आहे. व्यापार, उद्योगधंदे बुडाले आहे. आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणे यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री सहायता‍ निधी (कोविड-19) या नावाने अकाउंट उघडण्यात आले आहे. या सहायता निधीत मदत करण्यासाठी राज्यभरातून ओघ सुरू आहे. त्यात वणीकर ही मागे नाही. गुरूनगर येथील रहिवाशी असलेले गंगाधर मिलमिले यांची शिरपूर येथे शेती आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. या आपत्तीमध्ये मदतीसाठी आपलाही थोडाफार हातभार लागावा या उद्देशाने मिलमिले यांनी सीएम फंडाला मदत केली. त्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.