WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

लॉकडाऊनमध्ये मांस खाण्याची इच्छा; ‘या’ लोकांनी चक्क १० फूटी किंग कोब्राला मारुन खाल्लं!

Image

देशात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी ३ मे पर्यंत लॉकडाऊन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कामकाज लॉकडाऊनमुळे ठप्प पडलं आहे. प्रत्येक राज्यात लॉकडाऊनचं पालन सक्तीने होत आहे. अशातच अरुणाचल प्रदेशातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.लॉकडाऊनदरम्यान काही तरुणांना मांसहार खाण्याची इच्छा झाली त्यामुळे त्यांनी १० फूट कोब्रा सापाला मारलं आणि त्याला खावून टाकलं. सोशल मीडियावर या तीन शिकाऱ्यांचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात ते १० फूट किंग कोब्रा सापाला गळ्यात घेऊन फोटो काढत आहेत. ही घटना अरुणाचल प्रदेशातील नाहरलगुन परिसरातील आहे. उत्तर पूर्व राज्याकडे जंगली प्राण्यांना मांसासाठी मारण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनुसार या तीन शिकाऱ्यांचे म्हणणं होतं की, लॉकडाऊनमुळे घरातील तांदूळ संपले, आम्ही भूकेले होतो आणि मांसहार करण्याची इच्छा झाली होती. त्यासाठी आम्ही जंगलात गेलो. सरकारी अधिकाऱ्यांनी आमच्यावर रागवू नये कारण आम्ही सर्वसामान्य परिस्थितीत असं कधी करत नाही असं ते म्हणतात.माध्यमानुसार या घटनेला ईटानगरच्या वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. ज्या लोकांनी जंगलात जाऊन किंग कोब्रा सापाला मारुन खाल्लं त्या लोकांची ओळख पटली आहे. वन विभागाची टीम घटनास्थळी पोहचली होती. त्याठिकाणी सापाला मारुन खाल्लेलं आढळून आलं. स्थानिक लोकांनी वन विभागाच्या टीमला घेरल्यानंतर तात्काळ तिथून निघावं लागलं. या घटनेतील मुख्य आरोपी सध्या फरार आहे असं अरुणाचल विभागाचे वरिष्ठ वनविभाग अधिकारी उमेश कुमार यांनी सांगितले.दुसरीकडे, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू म्हणाले की, अवैधरीत्या वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आल्याचं पाहायला मिळालं आहे त्यात लोकांनी आपली भूक मिटवण्यासाठी मुक्या जनावरांना मारण्याचा केलेला प्रकार धक्कादायक आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share