WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

दहावीच्या निकालाबाबतची बातमी! बोर्डाच्या परीक्षेचा निकाल लांबणार?

Image

मुंबई, 20 एप्रिल : Coronavirus च्या प्रादुर्भावामुळे दहावीचा एक पेपर रद्द करावा लागला. दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द केल्यानंतर आता उत्तरपत्रिका तपासणीच्या कामाला हिरवा कंदील मिळाला आहे. लॉकडाऊनमुळे शिक्षक घरीच असल्याने हा लॉकडाऊन संपल्यानंतरच उत्तरपत्रिका तपासणीचं काम हाती घेण्यात येईल, असं बोर्डाकडून सांगण्यात आलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल नियमित वेळेपेक्षा दोन आठवडे विलंबाने लागू शकतो. तपासणीबाबतचं नियोजन करून निकाल वेळेवर लावायचा प्रयत्न करा, असे आदेश बोर्डाच्या अधिकाऱ्यांना दिल्याचं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. निकाल वेळेवरच लावायचं नियोजन केलं जाईल, पण उत्तरपत्रिका तपासायचं काम उशीरा सुरू होणार असल्याने 15-20 दिवस निकालाला विलंब होई शकतो, असंही त्या म्हणाल्याचं वृत्त सकाळने दिलं आहे. दहावीच्या उत्तरपत्रिकांची द्विस्तरीय तपासणी होते. परीक्षकांनी तपासलेल्या उत्तरपत्रिका मॉडरेटरकडे देण्यात येतात. लॉकडाऊनमुळे मॉडरेटरकडे पेपर पोहोचण्यात उशीर लागणार आहे. राज्याच्या काही भागातलं कामकाज या आठवड्यात सुरू होईल. जिथे कोरोनाव्हायरचा प्रभाव कमी आहे तिथले लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. तिथे आता तपासणीचं काम सुरू होईल. लॉकडाऊन संपल्यानंतर हे काम वेगाने सुरू होईल. जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापेक्षा निकालाला विलंब लागणार नाही, असा विश्वास वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केल्याचं वृत्त सकाळने दिलं आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.