WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

लॉक डाऊन मुळे हंगामी व्यवसायांचाही हंगाम जाण्याच्या मार्गावर ?

Image

प्रतिनिधी प्रशांत चंदनखेडे :-

कोरोना या साथीच्या रोगण उग्र रूप धारण करण्यास सुरवात केली असून देशासह महाराष्ट्रातही रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. यावर आळा बसण्याकरिता संचारबंदीचे नियम आणखीनच कठोर करण्यात आले असून काही शहरांतील बाजार वेळांचे तासही कमी करण्यात आले आहे. याचा सर्वाधिक फटका लघु व्यवसायांना बसला असून फिरते हातगाडी व्यावसायिक व स्थायिक हातगाडी व्यावसायिकांची वेळेअभावी रोजी निघणे सुद्धा कठीण झाले आहे. कोरोना लॉकडाऊनची सर्वच व्यवसायांना झळ बसली असून याचा परिणाम हंगामी व्यवसायांवरही मोठ्या प्रमाणात झाला आहे. या बंदीमुळे हंगामी व्यवसायिंकांचे तर पार कंबरडेच मोडले असून यावरच अवलंबून असणाऱ्यांवर तर आता उपासमरीची वेळ आली आहे. दरवर्षी फेब्रुवारी ते मे महिन्याचा कालावधी हा हंगामी व्यवसायांचा असतो. यामध्ये रसवंती, बर्फगोळ्याच्या गाड्या,आईस्क्रीम, गरिबांचे फ्रिज रांजण माठ, शीतपेयांची दुकाने, ज्यूसपॉईंट, मंडप डेकोरेशन, वाजंत्री समूह, फोटोग्राफर, आचारी वर्ग, कॅटर्स व्यवसाय, कुलर विक्री व दुरुस्ती करणारे, यांचा हा हंगाम जाण्याच्या मार्गावर असून काही दिवसांकरिता तरी व्यवसाय सुरु व्हावे म्हणून हा व्यावसायिक वर्ग लॉकडाऊन कधी शिथिल होतो याकडे नजरा लावून बसला आहे. हंगामी व्यावसायिकांचा हा हंगाम पूर्णतः निघून गेल्यास त्यांच्यावरचे उदरनिर्वाहाचे संकट अधिकच गडद झाल्याशिवाय राहणार नाही.  

      

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share