WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

अखेर तो वादग्रस्त नगरसेवक पक्षातून निलंबित…. अवैध दारू प्रकरण भोवले :- जिल्हाध्यक्ष भुतडा यांनी केले पक्षातून निलंबित….

Image

वणी :- सुरज चाटे, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्याच्या हद्दीत येणाऱ्या कुंभा येथिल देशी दारु दुकानावर दिनांक 18 ला सापळा रचून धाड टाकून लाखो रुपयाच्या दारुसाठ्या सह एकूण 24 लाख 45 हजार तिनशे चौपन्न रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलीस विभागाला मोठे यश आले होते व आरोपीना अटक सुद्धा करण्यात आले होते. त्यातीलच एक वणीचे विद्यमान नगरसेवक असल्याने त्यांना भाजपा चे यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आलेले व नंतर भाजपात प्रवेश केलेले प्रशांत निमकर याला पक्षातून 6 वर्षाकरिता निलंबित केले आहे.
देशात जीवनावश्यक सेवा वगळता संपूर्ण लॉकडाऊन असून याचाच फायदा अवैध धंदे करणारे जोरात घेत होते, अशीच एक घटना मारेगाव तालुक्यातील कुंभा या गावात पहावयास मिळाली होती. कुंभा ग्राम येथील जयस्वाल यांचे देशी दारुचे दुकानातुन वणी येथिल विद्यमान नगरसेवक छोटु उर्फ प्रशांत निमकर हा चारचाकी वाहनाने देशी दारु कुंभा- मारेगाव मार्गे वणी येथे वाहतुक करणार आहे, अशा माहिती वरुन सापळा रचून धाड टाकली त्यात राहुल जयस्वाल (37)रा.मारेगाव, छोटु उर्फ प्रशांत निमकर(32)रा.तेली फैल वणी, उमेश अरुण बहिरे (22) रा.जैन ले आउट वणी,सागर सुरेश आसमवार(30)रा.भिमनगर वणी, अल्ताफ लतिफ शेख(24)रा.माळीपुरा वणी,राहुल पंढरी कुचनकर(28)रा.तेली फैल वणी,विनोद दादाजी केळकर(33)रा.कुंभा ता.मारेगाव यांना अटक करण्यात यश आले होते मात्र आता अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या व भाजपात प्रवेश केलेला वणी पालिकेचा नगरसेवक प्रशांत निमकर यांना पक्षातून 6 वर्षासाठी निलंबित केले असून तसे निर्देश एका पत्रा द्वारे यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी दिले आहे, “त्यानी यात स्पष्ट सांगितले आहे की, आपण नगरपरिषद वणी जि यवतमाळ येथे अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत व आपण भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करून सदस्यत्व घेतलेले होते, कुंभा येथील दारूच्या दुकानातुन तस्करी प्रकरणी महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम कलम 65 अ (ई) 82, 83 सहकलम 51 (ब) आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 सहकलम 188, 269 भांदवी सहकलम 135 मपोका सहनियम कोविड-19 उपाययोजना 20 नियम 11 गुन्हा दाखल करून आपणास आरोपी केले आहे, वरील प्रमाणे दाखल झालेला गुन्हा हा भारतीय जनता पार्टीच्या शिस्तीच्या विरोधात असल्यामुळे आपणास भारतीय जनता पार्टीतून पुढील 6 वर्षाकरिता भारतीय जनता पार्टीतून निलंबित करण्यात येत आहे असे एका पत्राद्वारे कळविले आहे.
पक्षातून निलंबित केलेल्या नगरसेवकाला अवैध दारू प्रकरण चांगलेच महागात पडले असल्याने त्यांना यात पक्षातून निलंबनाचा दणका सहन करावा लागला आहे.वणी पालिकेतील सदस्यपद कायम असले तरी पक्षातील निलंबन मात्र त्यांच्या पदरी पडले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share