WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वाहतूक पोलिस उपनिरीक्षकाची महिलेस मारहाण ... वणी पोलिसात तक्रार दाखल

ImageImage

सुरज चाटे वणी :- वाहतूक पोलिसांनी गोकुळ नगर येथे वाहन तपासणी दरम्यान एका स्थानीक युवकाला दुचाकी चालविताना परवान्याची मागणी केली युवक परवाना आणण्यासाठी शेजारीच असलेल्या घरी गेला त्याचे पाठोपाठ वाहतूक पोलीस उपनिरीक्षक आपल्या सहकार्यासह त्याच्या घरी गेला व युवकास मारहाण करणे सुरू केले त्यात मध्यस्थी करता आलेली त्याची आई व बहिणीला सुद्धा अश्लील शिवीगाळ करत बंदुकीच्या धाकावर मारहाण करणे सुरू केले सदर प्रकार सुरू असताना गोकुळ नगर मधील इतर निवासी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने जमले होते सदर उपनिरीक्षक यांच्या विरोधात पोलिसात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे वनी पोलिसांनी यासंदर्भात चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी जमलेल्या संपूर्ण जमावाला दिले आहे

वणी शहरामध्ये वाहतूक पोलिसांची कार्यपद्धती नेहमी वादग्रस्त असलेल्या चे दिसत आहे शहरातील दक्षिण दिशेला असलेल्या गोकुळ नगर येथे अनेक दिवसापासून पोलिसांनी वाहनांची तपासणी करून त्यांच्याकडून दंड वसूल केला जात आहे येथील स्थानिया निवासी सुलताना मोहम्मद रफीक वय 44 वर्षे राहणार गोकुळ नगर जिल्हा यवतमाळ हिचा मुलगा भाजी मंडीतुन घरी दुपारी बाराच्या दरम्यान भाजीपाला घेऊन येत असताना घराशेजारी उभे असलेल्या पोलीस उपनिरीक्षक आणि त्याचे सहकार्याने दुचाकीचे कागदपत्रांची मागणी केली घर शेजारी असल्यामुळे मोहम्मद वसीम याने घरून कागदपत्रे आणून तुम्हाला दाखवतो असे त्यांना सांगितले व तो घरी आला त्याच्यापाठोपाठ पोलीस उपनिरीक्षक वाहतूक प्रफुल डाहुले हा त्याच्या सहकाऱ्यासोबत घरी आला व माझ्या मुलगा महम्मद वसिम याला मारहाण सुरू केली झालेल्या घटना अचानक झालेल्या घटनेने हादरून जाऊन मी त्यांना विचारले की माझ्या मुलाला का मारतात व मध्य मुलाला का मारतात व मध्यस्थी करण्यासाठी गेली असता त्यांनी मलाही मारहान केली त्यावेळी माझी मुलगी रेशमा परविन हीसुद्धा सोडवण्यासाठी आली असता तिला सुद्धा प्रफुल डाहुले यांनी तिच्या शरीरावरील ओढणी ओढून तिला धक्काबुक्की केली व अश्लील शिवीगाळ केली व हातातील आपले सर्विस रिव्हॉल्वर घेऊन आम्हाला धमकी देण्याचा प्रयत्न केला त्यावेळी शेजारील नागरिक महिला त्या ठिकाणी जमले होते या संपूर्ण जमावासमोर त्यांनी आम्हाला अश्लील शिवीगाळ करताना या ठिकाणी असलेल्या जमावाला सुद्धा अश्लील शिवीगाळ करून धमकी देण्याचा प्रयत्न केला अशी लेखी तक्रार वणी पोलीस स्टेशनला देऊन पीडित महिलेने कारवाईची मागणी केली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share