WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

प्लाझ्मा थेरेपीचा पहिला प्रयोग केलेल्या ‘त्या’ रुग्णाचा मृत्यू

Image

प्लाझ्मा थेरेपीचा पहिला प्रयोग केलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत करोनाबाधित रुग्णांवर रक्तद्रव उपचाराचा (प्लाझ्मा थेरपी) प्रयोग प्रथमच शनिवारी लीलावती रुग्णालयातील ५२ वर्षीय रुग्णावर करण्यात आला होता. त्या रुग्णाचा अखेर आज मृत्यू झाला.

ताप, सर्दी आणि फुप्फुसाचा संसर्ग झाल्याने ५२ वर्षीय रुग्णाला २० एप्रिलला वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. चाचण्यांमध्ये त्या व्यक्तीला करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झालं होतं. त्यानंतर या रुग्णाला कृत्रिम श्वसनयंत्रणेवरही ठेवण्यात आलं आहे. त्यानंतर रुग्णालयानं पालिकेकडे त्यांच्यावर प्लाझ्मा थेरेपीचा प्रयोग करण्याची परवानगी मागितली होती. रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी हे उपचार केले जात असल्याने पालिकेने प्लाझ्मा थेरेपी देण्यास मंजुरी दिली. त्यानुसार शनिवारी नायर रुग्णालयात करोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांनी दान केलेले प्लाझ्मा लीलावती रुग्णालयाला देण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी त्या रुग्णावर पहिली प्लाझ्मा थेरेपीचा प्रयोग करण्यात आला होता. आज अखेर त्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share