WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

क्रांती युवा तर्फे अडकलेल्याना ऑनलाइन निशुल्क नोंदणी....

Image

बाहेर जिल्ह्याचे व राज्याचे जाण्या किंवा येण्याकरिता गरजुनी लाभ घेण्याचे आवाहन.....

वणी :- सुरज चाटे

लॉकडाउन मुळे यवतमाळ जिल्ह्यात अडकलेल्या व परत जाण्याकरिता कोणतेही उपाययोजना नसलेल्यांना त्यांना त्यांच्या स्वगृही जिल्ह्यात परत जाण्याकरिता वणी सह परिसरातील जनतेकरिता क्रांती युवा संघटनेकडून ऑनलाइन नोंदणी निशुल्क करून देण्याच्या उपक्रमाचे आयोजन केले आहे त्याकरिता वणीतील 3 ठिकाणी तसे संघटनेचे पदाधिकारी बसून त्यांनी शासनाला सहकार्य करणार आहे अशा बिखरलेल्या जनतेनी स्वतः सर्वोत्तपरी नियमा नुसार येऊन आपले नांव नोंदणी करावे असे आवाहन क्रांती युवा संघटने कडून करण्यात आले आहे.

लोकडाऊन मुळे आधी जे जिथे अडकले होते ते तिथेच अडकून असल्याने त्यांचा मोठा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे आपले माहेरघर घर सगळ्यांनाच आपलेसे असते त्यामुळे अशा या भयावह परिस्थिती लक्षात घेता यवतमाळ जिल्ह्यातून इतर राज्यात/जिल्ह्यात पर्यटक / विद्यार्थी / यात्रेकरू / कामगार / इतर यांना जाण्याकरिता आता मार्ग सुकर केला असुन नियमानुसार ऑनलाइन नोंदणी संबंधित लिंक वर जाऊन करावयाची आहे त्यामुळे प्रत्येकाजवळ बऱ्यापैकी व ऑनलाइन सेवा उपलब्ध राहू शकत नाही तसेच गरीब मजूर यांना या सर्व बाबीची माहिती नाही तरी अशा गरजूंना क्रांती युवा संघटनेकडून मोफत नोंदणी करून देण्याचा उपक्रम राबवून प्रशासनाला सहकार्य करण्याच्या दृष्टीने मदतकार्य करणार आहे. वणीतील प्रेरणा स्टुडिओ गाडगे बाबा चौक, गोकुळ नगर येथील प्रेरणा स्टुडिओ व सत्यम हॉटेल जवळ अशा गरजुनी आपले आधार कार्ड, संपूर्ण माहिती, मोबाइल नंबर आदी सहित येऊन नोंदणी करावे त्याकरिता सुरज चाटे - 9518585970
राजू गव्हाणे 9764253253
विजू गव्हाणे 9822926480
नितीन येलकर 9689420020
गजानन चंदावार 8888422662
पांडुरंग गोपेवार 7498605757
अमन कुल्दीवार 9623396211
निखील वैरागडे 8857981597
याना संपर्क साधावे असे आवाहन क्रांती युवा संघटनेचे राकेश खुराणा, निकेत गुप्ता, लवलेश लाल, निलेश कटारिया सह संपूर्ण पादाधिकारी कार्यकर्त्यांनी केले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share