WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

जुगार खेळणाऱ्या अकरा झनांना पोलिसांनी केले अटक

Image

शहरातील जटाशंकर चौकातील घरसंसार सेल जवळील एका राहत्या घरी जुगार सुरु असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकून ४ लाख ७८ हजार ७५० रुपयांच्या मुद्देमालासह ११ आरोपींना अटक करून त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे पॉश वस्तीत जुगार भरविणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात लॉकडाऊन असून परिस्थितीचा आढावा घेण्याकरिता पोलिसांना शहरात गस्त घालावी लागते. यादरम्यान पोलिसांना घरसंसार सेल जवळील एका राहत्या घरी जुगार सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाली. याआधारे पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकली असता घराच्या वरच्या मजल्यावर घरमालकासह ११ जण जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले. या सर्वांना पोलिसांनी घटना स्थळावरच अटक करून ते खेळात असलेल्या ठिकाणावरून रोख ९५ हजार रुपये , १३ मोबाईल हँडसेट , ७ मोटरसाइकल , २ गाधी १ सतरंजी. ५२ ताश पत्ते असा एकूण ४ लाख ७८ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अविनाश विठ्ठलराव सोनुने(२५)रा. जैताई नगर वाणी, ओमप्रकाश दिलीप मुळे (३१) रा. जैन लेआउट, राहुल केशव नागतुरे(३१) रा. काजीपूरा, प्रणय अनिल सुतसोनकर (२४) रा. आंबेडकर चौक, गौरव मधुकर टोंगे (२५) रा. विठ्ठलवाडी, देवेंद्र विजय दिकोंडवार (२५) रा. मच्छिमार्केट, महेंद्र शामराव खाडे (३३) रा. जैन लेआऊट , राकेश बंडू ढवस (२४) रा. गणेशपूर रोड, राहुल उर्फ सोनल बंडू रोंडे (२५) रा. सानेगुरुजी नगर, रुपेश गेवरदास बोन्डे (२८) रा. गणेशपूर व घरमालक सतीश मंगल जाधव (३१) यांचा समावेश असून त्यांच्यावर संचारबंधीचे उल्लंघन करून बेकायदेशीर जुगार भरविणे, तोंडाला मास्क न लावणे, जमाव एकत्रित करणे या अंतर्गत कलम १८८,२६९ ब.द.वि. सह कलम ४,५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. कोरोनामुळे शहरात संचारबंदी लागू असून प्रशासनातर्फे शहरवासीयांना घरातच थांबण्याचे आव्हान करण्यात येत आहे. परंतु काही जुगारी प्रवृत्तीचे लोक याचा गैरफायदा घेत पॉश वस्त्यांमध्ये जुगार भरवत असल्याच्या कित्येक घटना उघडकीस आल्या आहेत. पोलिसांनी जुगारी व जुगार भरविणाऱ्यांच्या मुसक्या आवरण्याची मालिकाच सुरु केल्याने जुगाऱ्यांचे आता चांगलेच धाबे दणाणले आहेत. सादर कार्यवाही पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यवतमाळ , अपर पोलीस अधीक्षक नुरुळ हसन यवतमाळ, सा. उप. वि. पो. अ. सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक वैभव जाधव, डी. बी. प्रमुख पोउपनि गोपाल जाधव, पोहवा सुदर्शन वानोळे, पोना सुनील खंडागळे, सुधीर पांडे, रत्नपाल मोहाडे, पोकॉ पंकज उंबरकर , दीपक वांड्रसवार, अमित पोयाम यांनी केली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share