WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

झरी तालुक्यातील सुर्ला व अनंतपूर पोड येथे चिरंजिव रूद्र सुनिलजी कातकडे यांच्या वाढदिवसानिमित्

ImageImageImage

सुरज चाटे वणी - नगर सेवा समिती द्वारा आयोजित इंदिरा सुतगिरणीचे अध्यक्ष तथा नगर सेवा समितीचे आधारस्तंभ सुनिलभाऊ कातकडे यांच्या सहकार्याने चिरंजिव रूद्र सुनिलजी कातकडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून झरी तालुक्यातील सुर्ला व अनंतपूर या गावातील १०० गरजूंना ब्लॅकेट वाटप करण्यात आले.Image

सामाजिक उत्तरदायित्वाची जाण ठेवून सदैव सर्वाना सहकार्य करणारे मा.सुनिलभाऊ यांनी समितीच्या पदाधिकारी यांना बोलावून मुलाच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना ब्लॅकेट वाटप करण्याचा मनोदय व्यक्त केला. समितीने वाटप करण्याचे कबूल केले व सुर्ला ,अनंतपूर गावाची निवड केली.या गावातील ग्रामस्थांच्या वतीने चिमुकल्या रूद्र ला औक्षण व केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला व ज्येष्ठांनी याप्रसंगीआशिर्वाद दिले तसेच याप्रसंगी कातकडे कुटूंबिय उपस्थित होते. अशा पद्धतीने मुलाचा वाढदिवस साजरा करून कातकडे कुटूंबियांनी आदर्शपद्थती समाजात घालून दिली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुर्ला ग्रा.प.सरपंच किसनजी येडमे सर यांनी समितीच्या कार्याची व सुनिलभाऊ यांनी जोपासलेल्या सामाजिक जाणीवेची प्रशंसा केली .समस्त ग्रामवासिया तर्फे आभार मानले.सौ.रूपालीताई यांनी मुलाचा वाढदिवस साजरा केल्याबद्दल समस्त ग्रामवासियांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुर्ला ग्रा. प.सरपंच किसनजी येडमे तर प्रमुख अतिथी म्हणून सौ.रूपालीताई सुनिल कातकडे, समितीचे संस्थापक दिलीप कोरपेनवार, नारायणरावजी गोडे, अरूण कावडकर, प्रा.सतिशभाऊ विधाते,सौ.अनिताताई विधाते,सागर जाधव,चंद्रभानजी मेश्राम,पो.पाटील भारत येडमे,किशोरभाऊ दुधगवळी, संतोष दुधगवळी, तालुका बचतगट प्रमुख सौ. नंदाताई चौधरी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राष्टूपती पुरस्कार प्राप्त सुर्ला येथील मुख्याध्यापक तथा समितीचे उपाध्यक्ष आदरणीय रमेशजी बोबडे यांनी केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share