WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

गोकुळनगर येथे जुगार खेळतांना सहा आरोपींना अटक

Image

प्रशांत चंदनखेडे, वणी :-

शहरातील गोकुळ नगर येथे जुगार असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी टाकलेल्या धाडीत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून रोखरकमेसह ३४ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गोकुळनगर परिसरात जुगार भरविण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच डी बी प्रमुख गोपाळ जाधव यांनी आपल्या पथकासह याठिकाणी दुपारी ४ वाजताच्या सुमारास धाड टाकून सहा आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून २४ हजार ५०० रुपये रोख व मोबाईल असा एकूण ३४ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींमध्ये किशोर भगाडे (३८), विजय मारोती वाघडकर (२५), अनिल अजाबराव झरेकर (२३), किशोर ठमाजी भागडे (३२), संदीप भगत पोटे (२९), दिनेश भगत पोटे (१९) यांचा समावेश असून त्यांच्यावर कलम २६९ व महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम १२ (अ ) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सादर कार्यवाही एसडीपीओ सुशीलकुमार नायक व ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात डी बी प्रमुख गोपाळ जाधव, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, पंकज उंबरकर, दीपक वांड्रसवार, सुदर्शन वानोळे, प्रशांत आडे यांनी केली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share