WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

यूवा मित्र मंचाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर

Image

वणी :- राज्यात सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य रोगाने थैमान घातल्या नंतर राज्यात लॉकडाउन आणि संचारबंदी लागू करण्यात आली. या काळात आरोग्य विभागातील काही मुख्य घटकांवर मोठा ताण निर्माण झाला आहे, यात मुख्यतः रक्ताच्या साठ्यात घसरण झाल्याचे समोर आल्याने रुग्णांना लागणाऱ्या रक्तासाठी अडचण निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री श्री राजेश टोपे यांच्या सह अनेक संस्था व संघटनांनी रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आवाहन केले. त्यानंतर राज्यात बऱ्याच ठिकाणी अनेक राजकीय व सामाजिक संघटना पुढे येऊन भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले. याच धर्तीवर येत्या ७ जूनला वणी शहरातील युवा मित्र मंचच्या वतीने शहरातील धनोजे कुणबी समाज भवनात सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण देशामध्ये कोरोना या विषाणूने अनेक लोकांना यमसदनास पाठवलेले आहे. काही लोक रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत अशा बिकट परिस्थितीमध्ये रक्ताचा तुटवडा होऊ नये यासाठी भव्य रक्तदानाचे आयोजन करून रक्तदान माझ्या देशासाठी, करोनाशी लढण्यासाठी, जीवघेण्या आपत्तीसाठी व सामाजिक बांधिलकीसाठी या उदात्त हेतूने या मंचच्या वतीने हे रक्तदान शिबीर घेण्यात येत आहे. सध्या देशांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये संचारबंदी 144 कलम लागू आहे त्यामुळे रक्तदात्यांनी गर्दी न करता रक्तदान करून सहकार्य करायचे आहे रक्तदान हे श्रेष्ठदान आहे रक्तदानासाठी विशेष सहकार्य चंद्रपूर येथील शासकीय ब्लड बँकचे राहणार आहे तरी रक्तदात्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी दिपक रासेकर, शुभम गोरे, अनिकेत चामाटे, शुभम पिंपळकर, गीतेश वैद्य, शुभम इंगळे, सुमंत बच्चेवार, शंकर देरकर, संदीप गोहोकार, गौरव ताटकोंडावार, अभिषेक येसेकर, प्रसाद मत्ते, साई नालमवार, स्वप्निल बोकडे, सौरभ राजूरकर हे परिश्रम घेत आहे. या शिबिराला वणीतील सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी शुभेच्छा दिल्या असून त्यांनीही या शिबिराला मोठ्या संख्येने प्रतिसाद द्यावा असे आवाहन केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क – 9545959515, 7972284238, 9561762907, 7350503419, 8888686891, 8855847232, 9673136160, 7507759444

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share