WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कोव्हीड केंद्रात कॉरंटाईन असलेल्या व्यक्तीचा थ्रोट स्वाब घेण्यात आला

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

कोरोनाचे हॉटस्पॉट बनत चाललेल्या अकोला जिल्ह्यातून शहरात परतलेल्या एका व्यक्तीला पळसोनी कोविड केंद्रात कॉरंटाईन करण्यात आले. या व्यक्तीला ताप व खोकल्याची लक्षणे आढळल्याने खबरदारी म्हणून त्याचे थ्रोट स्वाब यवतमाळ येथील कोरोना लॅब मध्ये तपासणी करिता पाठविण्यात आले आहे.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णाची संख्या वाढीस लागली असून विदर्भातील काही जिल्हांमध्येही कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत आहे. अशातच कोरोनाचे हॉटस्पॉट बनत चालल्या अकोला जिल्ह्यातून वणी शहरात आलेल्या एका व्यक्तीला १ जूनला पळसोनि कोविड सेंटरमध्ये कॉरंटाईन करण्यात आले होते. त्याच्यामध्ये ताप व खोकल्याची लक्षणे जाणवू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्याचे थ्रोट स्वाब घेऊन यवतमाळ येथील कोरोना लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. परजिल्हा व परप्रांतातून शहरात येणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याकरिता पाटाळा फाट्यावर तात्पुरते आरोग्य सेंटर तयार करण्यात आले आहे. परजिल्हा व रेडझोन मधून आलेल्या नागरिकांची प्राथमिक तपासणी करून त्यांना होम कॉरंटाईन केल्या जात असून अशा नागरिकांनी कॉरंटाईनचा कालावधी पूर्ण होईस्तोर घराबाहेर पडू नये व इतरांचे आरोग्य धोक्यात घालू नये.असे प्रशासनाकडून सुचविण्यात आले आले आहे. तसेच सर्दी, ताप, खोकला व घशात दुखणं जाणवल्यास खाजगी दवाखान्यातील औषोधोपचारा बरोबरच ग्रामीण रुग्णालयातही स्वतःची तपासणी करून घेण्याच्या सूचनाही प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहे. असे काही लक्षणे आढळल्यास मेडिकल मधून तात्पुरत्या स्वरूपाच्या औषधी घेऊन सुस्त बसू नये. मास्क, सॅनीटायझर व सोशल डिस्टंसिंग या शासनाने सावधानीच्या उपाय योजनांतर्गत नेमून दिलेल्या त्रिसूत्रीचे नागरिकांनी नेहमी पालन करायला हवे. कोरोना सदृश्य कोणतेही लक्षणे आढळल्यास त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क करण्याचे आव्हानही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. रेड झोन मधून शहरात परतलेल्या या व्यक्तीचा स्वाब रिपोर्ट आल्यानंतरच त्याच्या आजाराचे नेमके कारण कळू शकेल. वणी तालुक्यात आतापर्यंत २९७४ नागरिक परठिकाणांवरून शहरात आले असून त्यांची प्राथमिक तपासणी करून त्यांना होम कॉरंटाईन करण्यात आले. त्यातील २३८२ नागरिकांचा १४ दिवसांचा होम कॉरंटाईन कालावधी पूर्ण झाला असून आजतायागत ५९२ नागरिक होम कॉरंटाईनमध्ये आहेत. यातील १५२६ नागरिकांना दिर्घ कालावधीनंतरही कोणतीही लक्षणे आढळलेली नसल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share