WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

अखेर रेती तस्कर गजाआड, पाटण पोलीस स्टेशनची कारवाई

Image

•परिसरातील वाळू माफियांचे धाबे दणाणले..!!

प्रतिनिधी/ योगेश मडावी (झरी- जामणी)

पोलीस स्टेशन पाटण येथे दिनांक 22-12-2020 रोजी तहसील कार्यालय झरी येथील कर्मचारी यांचेवर हल्ला प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी आज पावेतो फरार होते.

सदर गुन्ह्यातील दोन्ही रेती तस्कर आरोपी हे हायकोर्ट व सुप्रीम कोर्टात अटकपूर्व जामीन आणतो असे आविर्भावात होते. परंतु मा. पोलीस अधीक्षक साहेब व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिल कुमार नायक साहेब यांच्या मार्गदार्नखाली पाटण ठाणेदार बारापात्रे साहेब व पोलीस निरीक्षक गणेश मोरे यांनी केलेल्या उत्तम तपासामुळे दोन्ही आरोपीतांची सत्र न्यायालय पांढरकवडा व हायकोर्ट नागपूर येथे बेल नामंजूर झाली आहे. दिनांक 2जून रोजी रेती चोर आरोपी रवींद्र कायतवार वा संदीप बेलखेडे रा. चिखळडोह यांना अटक केली असून सध्या दोन्ही आरोपी पीसीआर मध्ये असून गुन्ह्यातील इतर सहभागी आरोपीतांची नावे निष्पन्न करून अटक करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share