WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

आजाराला कंटाळून विद्यार्थींनी ची आत्महत्या, डोलडोंगरगावात शोकाकुल

Image

•लॉकडाऊनमुळे वाढली डोक्याची डोकेदुखी....!!

प्रतिनिधी/सचिन मेश्राम

मारेगाव तालुक्यातील डोल (मच्छिन्द्रा) येथील 18 वर्षीय विद्यार्थीने केली आत्महत्या. कु.अर्चना प्रकाश मालेकर असे तरुणीची नाव आहे. दिनांक 4 जून रोजी सदर घटना दुपारी 4 वाजताच्या दरम्यान उघडीस आली. आत्महत्येचे नेमके कारण कळाले नसून टाळेबंदी मुळे कुटुंबियांच्या हाताला काम नसल्याने घरात आर्थिक अडचण असल्याचे पाहून सदर तरुणीने आत्महत्या केली असावी असे चर्चिल्या जाते.

मृतक विद्यार्थींनी ही वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथे 12 वी ला शिकत होती. लॉकडाऊनमुळे ती गावी परत आली. या दरम्यान तीला डोकेदुखी चा आजार हा ञस्त करत होता, पैशा अभावी उपचार होऊ न शकल्याने तीने मृत्यूला कवटाळले असावे असे निकटवर्तीयांनी सांगितले. घरच्यांना माहिती मिळताच तीला वणी येथे ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले असता, मालेकर कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले. सदर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share