WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

नाते आपुलकीचे संस्था फेडतेय समाजाचे ऋण

Image

नाते आपुलकीचे ही संस्था अगदी अल्पावधीत संकटकालीन गरजूंना मदत करणारी,संकटकाळात धावून जाणारी संस्था म्हणून नावलौकिकास आलेली संस्था आहे,समाजात आधार नसलेल्या रुग्ण गरजवंतांची संख्या आजमितीला खूप मोठ्या प्रमाणावर आहे त्या प्रत्येक रुग्णांचे दुःख कोणतीही संस्था पूर्णपणे दूर करू शकत नाही,असे असले तरी नाते आपुलकीचे ही संस्था आपल्यापरीने मोठ्या प्रमाणात नाही पण थोड्या प्रमाणात का होईना अशा गरजवंतांना मदतीचा हात देत असते,केवळ गरजवंतांना निस्वार्थ मदत करणे हाच एकमेव उद्देश ठेवून ही संस्था कार्यरत आहे आणि आज अशाच समाजातील अगदी गरजवंत लोकांना मदत करण्यात आली. बल्लारपूर येथील कॅन्सरग्रस्त रुग्ण श्री.मल्ला रेड्डी यांना संस्थेचे सन्माननीय सदस्य श्री.सतिशजी बावणे सर आणि श्री.प्रदीपजी मिर्यालवार यांनी त्यांच्या घरी जाऊन ₹ 10000/- संस्थेतर्फे आर्थिक मदत दिली तर मु.पो.मारडा येथील कॅन्सरग्रस्त रुग्ण श्री.संजय नानाजी टोंगे यांना त्यांच्या घरी जाऊन संस्थेचे सचिव प्रा.श्री.प्रमोदजी उरकुडे यांचे वडील श्री.वारलुजी उरकुडे यांच्या हस्ते ₹10000/- ची मदत सुपूर्द करण्यात आली,याप्रसंगी संस्थेचे सचिव प्रा.श्री.प्रमोदजी उरकुडे,उपाध्यक्ष श्री.किशनभाऊ नागरकर तसेच श्री.करण गौरकार उपस्थित होते. एवढेच नव्हे तर पश्चिम बंगाल येथे नुकतेच चक्रीवादळाने थैमान घातले आणि अशावेळेस संस्थेचे पुणे येथील संस्थेचे सन्माननीय सदस्य प्रसिद्ध काष्टशिल्पकार श्री.प्रभाकर पाचपुते यांचे सुंदरबन येथील मित्र श्री.रतन जाना यांनी त्यांच्यामार्फत संस्थेला मदत मागितली आणि चक्रीवादळाने ज्या लोकांचे नुकसान झाले त्यांना ₹ 5000चे जीवनावश्यक साहित्य पुरविण्यात आले.

आणि अशाप्रकारे नाते आपुलकीचे संस्थेने माणुसकी जोपासत सर्व गरजूंना ₹ 25 हजारांची संस्थेच्या ऐपतीप्रमाणे अल्पशी मदत करून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्याचे काम केले.समाजात अर्थातच देणाऱ्यांची संख्या कमी आणि गरजवंत लोकांची संख्या जास्त आहे. याच महिन्यात 16 तारखेला संस्थेला 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि 1 वर्षाच्या कालावधीत समाजातील अपंग,विधवा,कॅन्सरग्रस्त रुग्ण यांना अल्पसा मदतीचा हात देऊन त्यांच्या जीवनात प्रकाशाची किरणे पेरण्याचे काम केले आहे तर अनाथआश्रम,दुर्गम आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांना पुस्तके,स्कुलबॅगस,ब्लॅंकेटचे वाटप करून समाजाप्रती आपण काही देणे लागतो ही माणुसकीची भावना जोपासली आहे,तर अशा गरजवंतांना थोडी थोडी मदत करून नाते आपुलकीचा प्रत्येक सदस्य समाजाचे ऋण फेडण्याचे काम करीत आहे ही उल्लेखनीय बाब म्हणावी लागेल.

लेखन@उमेश पारखी

admin@nateaapulkiche.org

www.nateaapulkiche.org

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share