WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

दुचाकी चोरटे पोलिसांच्या ताब्यात

Image

पोलिसांनी चोरट्यांवर आवरला फास, एकाच दिवसात झटपट चोरीचा छडा लावलेले हे दुसरे प्रकरण

प्रतिनिधी प्रशांत चंदनखेडे :-

शहरातील यवतमाळ मध्यवर्ती बॅंकेजवळून चोरीला गेलेल्या दुचाकीचा अवघ्या काही तासांतच पोलिसांनी छडा लावून दुचाकीसह चोरट्यानां ग्रामीण रुग्णालय परिसरातून अटक केली आहे. यवतमाळ मध्यवर्ती बँकेसमोर उभी असलेली दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार कळमना येथील गजानन निळकंठ धांडे यांनी सोमवारी ८ जूनला वणी पोलीस स्टेशनला नोंदविली. तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच पोलिसांनी तपास चक्रे फिरवून ग्रामीण रुग्णालय परिसरातुन अजय रामदास दडांजे (२२) रा. पोहणा(नांदेपेरा) व अमोल शंकर डाखरे (२७) रा. नांदेपेरा यांना अटक करून त्यांच्या जवळून MH २९AP८४३८ क्रमांकाची चोरीतील दुचाकी जप्त केली.

कळमना येथील गजानन निळकंठ धांडे यांनी आपली दुचाकी यवतमाळ मध्यवर्ती बँकेसमोर उभी करून काही कामानिमित्त ते बँकमध्ये गेले.बँकेमधील कामे आट्पुन ते बाहेर आले असता त्यांना दुचाकी कुठेही आढळून आली नाही. त्यांनी खूप शोधाशोध घेतल्यानंतरही दुचाकी कुठेही आढळून न आल्याने अखेर वणी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तपासचक्रे फिरवीत अवघ्या काही तासांतच मुखाभिरांकडून माहिती मिळवत ग्रामीण रुग्णालय परिसरातुन दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून चोरीला गेलेली दुचाकी जप्त करून त्यांच्यावर भादवी च्या कलम ३७९ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share