WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

राजूर प्रा आ केंद्राचे डॉक्टर एक आठवड्यापासून गैरहजर

Image

● ताला ठोको आंदोलनाने मिळाले होते डॉक्टर
● डॉक्टर नसल्याने नागरिक आरोग्य सेवा मिळण्यापासून वंचित
● आमरण उपोषणाचा इशारा
-----------------------------------------
सुरज चाटे वणी: राजूर कॉलरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ उघडे मागील एक आठवड्यापासून गैरहजर असल्याने पुन्हा एकदा परिसरातील जनता आरोग्य सेवेपासून वंचित ठरली आहे. Image मागे दोन महिने येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला वैद्यकीय अधिकारी नसल्याने येथील कांग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, बहुजन समाज पार्टी, मनसे, बिरसा ब्रिगेड, राजूर विकास संघर्ष समिती, आदिवासी युवा जनजागृती संघटना,राजूर ग्राम विकास संघटना आदींनी मिळून प्रा आ केंद्राला ताला ठोको आंदोलन केले होते. ह्या आंदोलनाला अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांनी ताबडतोब पाठपुरावा करून डॉ उघडे यांना इथे रुजू केले व जनतेची आरोग्याच्या सुविधेची समस्या मिटविली. पण डॉ उघडे हे मागील एक आठवड्यापासून गैरहजर असल्याने समस्या पूर्ववत झाली आहे. या संदर्भात तालुका अधिकारी यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी पूर्वसूचना न देता डॉ उघडे हे गैरहजर असल्याचे सांगितले. डॉ उघडे यांचेशी दूरध्वनी वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या फोन लागत नाही आहे. Image ता आ अधिकारी डॉ कांबळे यांच्याकडे जास्तीचे कामे असल्याने ते राजूर प्रा आ केंद्राला ओपीडी काढण्याकरिता सकाळी उशिरा येतात व सायंकाळी येतच नाहीत. परिणामी जनतेला योग्य आरोग्य सेवा मिळणे कठीण झाले आहे. या संदर्भात आरोग्य विभागाने पाऊले उचलली नाहीत तर यावेळेस खरोखरच प्रा आ केंद्राला स्थायी कुलूप बंद आंदोलन केल्या जाईल असे आंदोलनकर्ते डेव्हिड पेरकावार,कुमार मोहरमपुरी, प्रवीण खानझोडे,अनिल डवरे, जयंत कोयरे यांचेकडून सांगितले जात आहे. या बाबतीत मनसे चे प्रदीप बांदूरकर यांनी दहा दिवसांत स्थायी व २४ तास सेवा देणारे दोन वैद्यकीय अधिकारी दिले नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशारा ता आ अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share