WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

अवैध रेती वाहून नेणारे दोन ट्रॅक्टर जप्त , महसूल व पोलीस विभागाची धडक कारवाई

Image

प्रशांत चंदनखेडे प्रतिनिधी वणी :-

अवैध रेती वहन करीत असलेल्या दोन ट्रॅक्टरवर कारवाई करून ते ताब्यात घेण्यात आले. महसूल प्रशासन व पोलीस विभाग यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. नांदेपेरा जवळील सोनापूर नजीक अवैध रेतीची वाहतूक करीत असल्याचे आढळल्याने हे दोन्ही टॅक्टर जप्त करण्यात आले. ही कारवाई १९ जूनला रात्री ३ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

नांदेपेरा जवळील वाघाळा नाल्याजवळ रेती तस्करांनी मोठा रेती साठा जमा करून ठेवला असून येथून मागील काही दिवसांपासून रेती तस्करी सुरु असल्याचे सांगण्यात येते. रेती तस्करांकडून होत असलेल्या अवैध रेती वाहतुकीची आधी पासूनच ओरड सुरु असून वृत्त पत्रातूनही या रेती साठ्या विषयीचे वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. १८ जूनला नायब तहसीलदार वैभव पवार यांना रेती तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी डीबी प्रमुख गोपाल जाधव, सुधीर पांडे व सुनील खंडागळे त्यांच्यासह रात्री उशिरा सापळा रचून नंबर नसलेले दोन ट्रॅक्टर अवैध रेती वहन करीत असल्याचे आढळल्याने त्यांच्यावर जप्तीची कार्यवाही करून दोन्ही ट्रॅक्टर पोलीस स्टेशनमध्ये लावले. सदर दोन्ही ट्रॅक्टर भांडेवाडा येथील माजी सरपंच प्रेमानंद भाऊराव धानोरकर यांच्या मालकीचे असून त्यांच्यावर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नायब तहसीलदार वैभव पवार यांनी दिली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share