WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणीत आणखी दोन रुग्णाची भर, एकूण संख्या पाच

ImageImageImage

प्रशांत चंदनखेडे वणी :-

यवतमाळ, दि. 23 : गत दोन तीन दिवसांपासून 63 वर स्थिरावलेल्या ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांच्या संख्येत मंगळवारी अचानक वाढ झाली. आज दिवसभरात 15 जणांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह आले आहे. यात नेर येथील 10 जण, दिग्रस आणि वणी येथील प्रत्येकी दोन तर एक दारव्हा येथील व्यक्ती पॉझेटिव्ह आला आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 26 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 15 पॉझेटिव्ह तर 11 निगेटिव्ह रिपोर्ट आहे. निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्यांमध्ये दारव्हा येथील सहा, नेर येथील तीन, वणी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या 78 आहे. तसेच 24 तासात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 224 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहे.

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात 82 जण भरती आहे. वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 3971 नमुने तपासणीकरीता पाठविले असून यापैकी 3673 प्राप्त तर 298 अप्राप्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या 247 आहे. यापैकी 78 एक्टिव पॉजिटिव्ह असून 161 लोकांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात 8 लोकांच्या मृत्युची जिल्ह्यात नोंद असून सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 3452 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.