WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मागील दोन दिवसांपासून शहरात एकही पोझिटिव्ह रुग्ण नाही , प्रशासनाच्या उपाय योजनांना आले यश

Image

प्रशांत चंदनखेडे प्रतिनिधी वणी :-

शहरातील कोरोना बाधितांच्या संपर्कातील ज्या व्यक्तींना संस्थात्मक विलीगीकरणात ठेवण्यात आले त्यापैकी ४ निगेटिव्ह व्यक्तींना डिस्चार्ज तर ११८ व्यक्तींना (लो रिस्क) हातावर होम कोरंटाईनचे शिक्के मारण्यात आले असून त्यांना इतर कोठेही भ्रमंती करण्यास शासनातर्फे मज्जाव करण्यात आला आहे. ते शहरात कोठेही फिरतांना आढळल्यास त्यांच्यावर उचित कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून अलर्ट झालेल्या प्रशासकीय व्यवस्थेने कोरोनाची साखळी तोडण्या करीता दिवस रात्र राबून विविध उपाय योजनांतर्गत कोरोनाच्या वाढत्या संख्येवर अंकुश लावला आहे. कोरोना बाधितांच्या जवळच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून काढून त्यांना विलीगीकरणात हलवून त्यांचे (हाय रिस्क) नमुने तपासणी करीता पाठविण्यात आले. संस्थात्मक विलीगीकरणात असतांना काहींनी विलीगीकरण केंद्रा बाबत असुविधा व अस्वच्छतेचे पुष्कळशे पाठेही वाचले. परंतु प्रशासनाने त्यांच्या या तक्रारींकडे विशेष लक्ष न देता आपल्या प्रमुख उद्दिष्टांकडे लक्ष केंद्रित करून या आजाराला मुळातून उफडून काढण्या करिता प्रयत्नांची पराकाष्ठा केली. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांवर वॉच ठेऊन त्यांच्या जास्तीतजास्त तपासण्या करून अतिजोखिमीत असलेल्या व्यक्तींना विलीगीकरणात हलवून त्यांचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आले. त्यामुळे खऱ्या रुग्णांचे निदान होऊन बहुतांश निकटवर्तीय निगेटिव्ह आल्याने नागरिकांच्याही भीतीचे निराकरण झले. आजच्या घडीला ९ रिपोर्ट प्रलंबित असून ४ निगेटिव्ह व्यक्तींना डिस्चार्ज करण्यात आले असून ११८ व्यक्तींना (लो रिस्क) शिक्के मारण्यात येणार आहे. शिक्के मारलेली व्यक्ती बाहेर कुठेही आढळल्यास त्याच्यावर कार्यवाही करण्यात येणार आहे. २० जून ते २४ जून पर्यंत दररोज रुग्ण आढळत असल्याने रुग्णसंख्या मोठा आकडा गाठते की काय असे वाटत असतांनाच २५ व २६ जून या दोन दिवसांत एकही व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह न आल्याने परिस्तिथी नियंत्रणात असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाची नियोजनबद्धता व आरोग्यविभागाने आशा सेविकांमार्फत नागरिकांची घेतलेली दक्षता तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी सुचविलेल्या मार्गदर्शक सूचना यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळविता आल्याने सर्वानीच समाधान व्यक्त केले आहे. कितीही टीकेची झोड उठली तरी सर्वहिताकरिता कोरंटाईन रहावेच लागणार असून कोरंटाईन सेंटरमध्ये सर्वच पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. २०० मुलांच्या या वसतिगृहात १० शौचालय व १०बाथरूम असून चालू स्थितीतील हे वसतिगृह मागील काही दिवसांपासून आरोग्य विभागाच्या अधीन आहे. साफसफाई व देखरेखी करीता पुरेपूर कर्मचारी उपलब्ध असून प्रशासनाच्या २४ तास निगराणीत या कोविड सेंटरचा कारभार सुरु असतो. नामांकित कॅटर्सचे जेवण याठिकाणी उपलब्ध असून दिवसातून दोन वेळेस रुग्णांना गरम पाणी दिल्या जाते. एकूणच सुविधापूर्ण असलेल्या या कोविड केंद्रात रिपोर्ट प्राप्त होईस्तोर किंवा कालावधी पूर्ण होई पर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना ठेवण्यात येते. मागील दोन दिवसांपासून एकही रुग्ण न आढळल्याने नागरिकांच्या मनातील भीती निवळली असून बाजारात त्यांची चहलपहल आढळून आली आहे. प्रशासनाची चिंताही काही अंशी कमी झाली असून त्यांनी केलेल्या उपाय योजनांना यश आल्याने त्यांच्यात समाधान पाहायला मिळत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share