वणी शहरात आणखी एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या झाली सात !


प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरातील कोरोना बाधितांच्या संपर्कातील संस्थात्मक विलीगीकरणात असलेल्या ९ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह तर ८ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना पॉझिटिव्ह संख्या ७ झाली आहे.
२४ जूनला एका व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर दोन दिवस कोरोनाचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह न आढळल्याने कोरोनाची साथ निवळत असल्याचे वाटत असतांनाच आज नव्याने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून नागरिकांमध्येही भीती निर्माण झाली आहे. कोरोनाची साथ आटोक्यात आली असल्याचे जाणवत असतांनाच आणखी एका रुग्णाची भर झाल्याने कोरोनाची संख्या वाढतीवर लागली आहे. त्यामुळे मागील दोन दिवस भीतीच्या सावटातून बाहेर पडलेल्या नागरिकांना हा आणखी एक धक्का बसला असून त्यांच्यात चांगलीच घबराहट निर्माण झाली आहे. प्रशासन योग्य ती दक्षता घेत असून नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घेण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.