WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शहरात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असल्याने जनता कर्फ्यू पाळण्याचा सर्व पक्षीय सभेत निर्णय

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

जिल्ह्यातील विविध तालुके व गावांमध्ये कोरोनाचे लोन पसरल्यानंतरही तीन महिन्यांपर्यंत कोरोनमुक्त राहिलेल्या वणी शहराला मुंबई कनेक्शन नडले व तेथून आलेल्या कुटूंबाने अखेर शहरात कोरोनाची बीजे रोवली. 20 जून पासून २४ जून पर्यंत ६ रुग्ण व दोन दिवसांच्या व्यत्ययानंतर २७ जूनला ७ वा पॉझिटिव्ह रुग्ण निघाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कोरोनाची हि साखळी तोडण्या करिता प्रशासन अहोरात्र प्रयत्न करीत असतांना आज झालेल्या सर्वपक्षीय सभेत सर्वच सुज्ञ नागरिकांनी इतर नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून सोमवार पासून शुक्रवार पर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचे ठरविले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे,

आज २७ जूनला सातवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनही चिंतेत पडले आहे. रुग्णांची संख्या दिसेंदिवस वाढत असल्याने नागरिक चांगलेच धास्तावले असून शहरात कोरोनाचा विळखा घट्ट तर होणार नाही ना ही एकच चिंता त्यांना सताऊ लागली आहे. दोन दिवस पॉझिटिव्ह रुग्ण न आढळल्याने कोरोनाला ब्रेक लागल्याची चर्चा सुरु असतांनाच आज पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने समाधानी चेहऱ्यांवर भीतीचे सावट दिसू लागले आहेत. प्रशासनाचीही डोके दुखी चांगलीच वाढली असून संपूर्ण यंत्रणा कमला लागली आहे. रुग्ण राहत असलेल्या मोक्षधाम परिसरासमोरील आजूबाजूचा १५० मीटर परिसर सील करण्यात आला असून या परिसराला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. कोरोनाचे लोन संपूर्ण शहरात पसरू नये याकरिता खबदारीचा उपाय म्हणून जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय सर्व पक्षीय सभेत घेण्यात आला आहे. सतत वाढत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमुळे शहरवासी चांगलेच हादरले आहेत. पुष्कळ दिवस शहर कोरोनामुक्त व शहरवासी भीतिमुक्त असतांना मुंबई रिटर्न व्यक्तीमुळे अखेर शहरात कोरोनाचा शिरकाव झाला व प्रसन्न चेहऱ्यांवर चिंतेचे ढग निर्माण झाले. सौख्याने नांदत असलेल्या शहरातील जनतेत अचानक दुरावा निर्माण झाला. दुरूनच नमस्ते व घराबाहेरूनच चालते करण्या इतपत परिस्थिती शहरात निर्माण झाली. कोरोनाची गडद छाया आपल्यावर पडू नये म्हणून दुराव्याच्या विरहात जनता लोटली गेली. विरंगुळ्यासाठीही जवळच्या लोकांकडेही जाण्याची धास्ती वाटू लागली. आता कोरोना कोणतं रूप धारण करतो या चिंतेने सर्वांनाच ग्रासले आहे. वाढती संख्या कोणता आकडा गाठते याकडे आता सरवासियांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कातील आलेल्या लोकांकडून कोरोना संक्रमण वाढू नये याकरिता सोमवार ते शुक्रवार जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय सर्वसामान्य नागरिकांच्या संमतीने सर्व पक्षीय नेत्यांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share