वणीतील ए टी एम वर सुद्धा सॅनिटायझर ची गरज?..... कोण येई कसा कोण जाणतो? :- लागलेल्या रांगा ठरू शकतात धोक्याची घंटा....?..

वणी :- सुरज चाटे
जगभरात सध्या कोरोणाने चांगलाच हाहाकार माजवला असल्याने संपूर्ण जग भीतीमय वातावरणात आहे त्यापासून बचावण्याकरीता सोशल डिस्टनसिंगचा, सॅनिटायझर व स्वतःची काळजी घेणे हेच उत्तम उपाय असून आता सध्या वेळापत्रकात काही प्रमाणात बदल झाला असल्याने नागरिकांनी आपला मोर्चा पैसे कढण्याकरिता एटीएम कडे वाढविला आहे. त्या ठिकाणी कधी कधी लागलेल्या रांगा सुद्धा धोक्याची घंटा ठरू शकते तिथे संबंधित ए टी एम तथा बँकेकडून सॅनिटायझर व आदी सुरक्षित राहण्यायोग्य उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे कारण कोण येई कसा कोण जाणतो? असाच काहीसा प्रकार या कोरोना सारख्या महाभयंकर परिस्थितीत निर्माण झाला असल्याने संबंधितांनी यांवर विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
वणी ही आसपासच्या खेळयां पाळ्या वरील लोकांची मुख्य बाजारपेठ असल्याने विविध महत्वाच्या कामानिमित्त वणी गाठावी लागते. सध्या कोरोनाचे संकट जगभरात असून त्याचे पडसाद वणीत सुद्धा पडले आहे. वणीत कोरोना रुग्णांचा आकडा सात वर गेल्याने वणीतील नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली होती मात्र आता आकडा स्थिर आहे त्यात प्रशासन जोमाने कामाला लागले असले तरी आपली जबाबदारी आपण सुद्धा पार पाडणे महत्वाचे झाले आहे. दिवसागणिक ए टी एम सारख्या ठिकाणी नागरिकांची गर्दी पहावयास मिळते मात्र ए टी एम वर येणारा व्यक्ती कुठून येतो, कसा येतो? याचे मात्र भान नाही बँकेत सर्व सोयी उपलब्ध केल्या सॅनिटायझर, मास्क, tempratureस्क्रिनिंग मशीन आदी पण काही प्रमाणात का होईना प्रत्येक ए टी एम वर सॅनिटायझर तरी ठेवणे महत्वाचे झाले आहे प्रत्येक व्यक्ती आपल्या सोबत आवश्यक त्या सॅनिटायझर चा वापर करीत नसतो त्यामुळे संबंधित बँक ए टी एम कडून याची दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.