WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शहरात सहा दिवसानंतर आढळला आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण , रुग्णांची संख्या झाली आठ

ImageImage

प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहरात मागील सहा दिवसांपासून कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसल्याने कोरोनाची साथ नियंत्रणात असल्याचे वाटत असतांनाच आज ४ जुलैला शहरात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने शहरात कोरोनाने परत एकदा डोके वर काढले आहे. शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता आठ झाली आहे. चिखलगाव रोडवरील रुग्ण राहत असलेल्या परिसराला सील करण्यात आले असून तहसील समोरील व्यावसायिक प्रतिष्ठानही सील करण्यात आले असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

शहरातील एका मागून एक कोरोना अहवाल निगेटिव्ह येत असतांना कोरोना नियंत्रणात आल्याचे जाणवू लागले होते. प्रशासनानेही तसा दुजोरा दिल्याने कोरोनाची साथ निवळत आल्याचे वाटत असतांनाच शहरात आज आणखी एक कोरोना पोझटीव्ह रुग्ण आढळून आल्याने प्रशासन चिंतेत पडले असून शहरवासियांमध्ये चांगलीच भीती निर्माण झाली आहे. गेले सहा दिवस एकाही व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह न आल्याने कोरोनाची साखळी तोडण्यात प्रशासनाला यश आल्याचे वाटत असतांनाच आज शहरातील एका व्यावसायिकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात कोरोना परत एकदा सक्रिय झाल्याचे वाटायला लागले आहे. कालपर्यंत शहरातील एका नामांकित स्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या या व्यक्तीचा नागपूर येथे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून नागपूर येथील रुग्णालयात सदर व्यक्तीवर उपचार सुरु आहे. कोरोनाचे संक्रमण वाढू नये याकरिता प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असतांनाच शहरात नवीन रुग्ण आढळत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे. कोरोनावर पायबंद लागल्याचे समाधान झळकत असतांनाच काही दिवसांनी परत रुग्ण आढळत असल्याने शहरवासियांमध्ये भीती तर प्रशासनाच्या चिंतेत वाढ होत आहे. शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या व नेहमी गर्दीने गजबजून राहत असलेल्या व्यावसायिक प्रतिष्ठानातील व्यापारीच कोरोना पोझटीव्ह निघाल्याने नागरिकांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे. शहर प्रशासन व आरोग्य विभागाने रुग्णाचं वास्तव्य असलेल्या परिसराला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करतांनाच त्यांच्या घराच्या सभोतालचा परिसर सील केला आहे. तसेच व्यावसायिक प्रतिष्ठानही सील केले आहे. शहरात आज आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णामुळे एकंदरीत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता आठ झाली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share