झरी तालुक्यातील महादापूर येथील १६ व्यक्तींचे स्वाब तपासणी करीता पाठवले लोरीस्क व्यक्तींच्या यादीतून ७ व्यक्तींना वगळले
प्रशांत चंदनखेडे वणी :-
झरीजामणी तालुक्यातील महादापूर गावात बाळंतपणा करीता माहेरी आलेल्या २२ वर्षीय महिलेचा यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाल्यानंतर तिचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली. महिला राहत असलेल्या महादापूर या गावाच्या सीमा पूर्णपणे सील करण्यात आल्या असून महिलेच्या अगदी जवळून संपर्क आलेल्या १६ व्यक्तींचे (हायरिस्क) नमुने तपासणी करिता पाठवण्यात असून ४३ व्यक्तींना संस्थात्मक विलीगीकरणात हलविण्यात आले आहे. हायरिस्क व लोरीस्क व्यक्तींना वेगवेगळ्या कक्षात ठेवण्यात आले असून आणखी व्यक्तींचे स्वाब तपासणी करीता पाठवण्याची प्रक्रिया सुरु आहे. सुरुवातीला लोरीस्क व्यक्तींच्या जाहीर केलेल्या यादीतून महिलेशी दूरपर्यंत संपर्क नसलेल्या सात कार्यालयीन व्यक्तींची नवे वगळण्यात आली असून कोणतीही शहनिशा न करता त्यांची नावे लोरीस्क यादीत टाकण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी मोहन गेडाम यांनी सांगितले आहे.
झरी तालुक्यातील महादापूर गावातील गर्भवती महिलेला ९ महिने पूर्ण झाल्याने आधी झरी ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले नंतर पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले व त्यानंतर यवतमाळ शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आल्याने यवतमाळ येथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. श्वसनाचा त्रास होत असल्याने तिची कोरोना तपासणी करण्यात आली असता चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने झरी तालुक्यात पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद होतांनाच पहिल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या मृत्यूचीही नोंद झाली. यामुळे तालुका प्रशासन चांगलेच हादरले असून नागरिकांमध्येही भीती निर्माण झाली आहे. ३ जुलैला पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कातील १६ व्यक्तींना (हायरिस्क) ट्रेस करून त्यांना विलीगीकरणात हलवून ४ जुलैला त्यांचे स्वाब तपासणी करिता पाठविण्यात आले. त्यानंतर १७ लोरीस्क व्यक्तींना अलग कक्षात विलीगीकरणात ठेवण्यात आले. ज्या १७ व्यक्तींची यादी जाहीर करण्यात आली त्यातील ७ कार्यालयीन व्यक्तींचा पॉझिटिव्ह महिलेशी दूरवर संपर्क आला नसल्याने आरोग्य विभागाने शहनिशा करून त्या व्यक्तींची नावे लोरीस्क यादीतून वगळली असून त्यांना विलीगीकरणातून मोकळे करण्यात आले आहे. ४ जुलैला आणखी ३३ व्यक्तींना (लोरीस्क) विलीगीकरणात हलविण्यात आले असून त्यांचे स्वाब घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. प्रशासन विविध उपाययोजना करीत असून नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे.