वीजबिल भरण्याकरिता लागलेल्या रांगेत फिजिकल डिस्टंसिंगचे उल्लंघन
प्रशांत चंदनखेडे वणी :-
लॉकडाऊनमुळे मागील तीन महिन्यांपासून मीटर रिडींग व घरपोच वीजबिलांचे वाटप बंद असल्याने तीन महिन्यांचे एकत्रित वीजबिल जून महिन्यामध्ये नागरिकांच्या हाती मिळाले. अवाढव्य वीज बिल आल्याने नागरिकांनाही चाबगलाच धक्का बसला. लॉकडाऊनच्या काळात रोजगार, व्यावसाय पूर्णतः ठप्प पडल्याने नागरिकांचे आर्थिक स्रोतही बंद झाले. त्यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या नागरिकांना जमापुंजीतून दैनंदिन गरजा भगवाव्या लागल्या. परीस्थीपुढे हतबल होऊन आर्थिक दुर्बलता आलेल्या सामान्य नागरिकांना आवाक्याबाहेरचे वीजबिल आल्याने त्यांचे डोके चक्रावले आहे. "साहेब आमच्या घरी विजेवर चालणारी कोणतीच मोठी उपकरणे नाही हो " हे पटवून सांगतांना ग्राहक चुकीचे बिल पाठवल्याचे विद्युत अधिकाऱ्यांना समजावून सांगण्याचा करीत होते. वीजबिल कमी होईल या आशेने विद्युत कार्यालयाच्या चकरा मारत होते. परंतु वीजबिल कमी करण्यास संबंधित अधिकारी धजावत नसल्याचे पाहून वीज पुरवठा कायमचा खंडित होण्याच्या भीतीपोटी नागरिकांनी अर्थसहाय्य जुळवून वीजबिल भरण्याकरिता वीजकेंद्रावर एकच गर्दी केली. वीजकेंद्रावर नागरिकांची लांबचलांब रांग लागली होती. रांगेत उभे असलेल्या नागरिकांमध्ये योग्य अंतर राखले न गेल्याने सोशल डिस्टंगसिंगचा एकूणच फज्जा उडाल्याचे दिसत होते. वीजबिल भरण्याच्या लगबगीत सामाजिक अंतराचे कुठलेही भान त्यांना राहिले नव्हते. रांगेमध्ये शिस्तीत उभे राहण्यास सांगणारा कोणताही कर्मचारी त्याठिकाणी ठेवण्यात आलेला नव्हता. शहरात आधीच कोरोनाची नव्याने साखळी तयार झालेली असतांना नागरिक व वीजकेंद्राचा हा बेजबाबदारपणा कोरोना संक्रमणाचे कारण बनू शकतो. मास्क, हँडवॉश व फिजिकल डिस्टन्स या त्रिसूत्री नियमांचे पालन करूनच कोरोना पासून बचाव होऊ शकतो हे शासनातर्फे वारंवार सांगूनही नागरिकांच्या लक्षात येत नाही याचेच नवल वाटते.