मारेगावचे मुख्याधिकारी गायकवाड यांचे स्थांनातरण
यवतमाळ :
मारेगाव, सचिन मेश्राम : मारेगाव येथील नगरपंचायतचे मुख्याधिकारी निलेश गायकवाड यांचे स्थांनातरण झाले आहे. अवघ्या चार महिन्यापूर्वी रुजू झालेल्या स्थानीक स्वराज्य संस्थेत शहराच्या विकासाचे पाय रोवत असतांना प्रशासनात चांगलाच जम बसविला होता. मात्र अवघ्या चार महिन्यात स्थांनातरण झाल्याने मारेगावकरात नाराजीचा सुर उमटत आहे. गेल्या चार महिन्यापूर्वी मारेगाव नगरपंचायत मध्ये मुख्याधिकारी म्हणून रुजू झालेले निलेश गायकवाड यांची आज मंगळवारला वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथे अचानक स्थांनांतरण झाले आहे. त्यांनी प्रशासकीय कामात चांगलाच वचक निर्माण करुन प्रशासनात वेगळीच ओळख निर्माण केली होती. त्यामुळे अवघ्या महिन्यातील स्थांनांतराने शहराच्या विकासाला खीळ बसेल का असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान सदर स्थांनांतरण विनंती पूर्वक असल्याची विश्वसनीय माहिती प्राप्त झाली आहे. शहराच्या विकासाला चालना मिळण्यासाठी नविन मुख्याधिकारींची तात्काळ नेमणूक करावी अशी मारेगाववासीयांची मागणी आहे.