WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

विदेशातून परत येत असलेला विध्यार्थी व शहराबाहेर उपचाराकरिता गेलेली महिला निघाली पॉझिटिव्ह

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी काल ९ जुलैला ४ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आज १० जुलैला आणखी एक रुग्ण कोविड - १९ या आजारातून पूर्णपणे बरा झाल्याने त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून शहरातील कोरोना बाधितांची संख्या ७ झाली असतांनाच विदेशात एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेल्या वणी शहरातील आनंदनगर परिसरातील एका विद्यार्थ्याचा यवतमाळ येथे अँटीजन चाचणीद्वारे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच वणी येथील ६५ वर्षीय महिलेचा सेवाग्राम येथे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहरात सध्यास्थितीत ५७ व्यक्ती क्वारंटाईनमध्ये असून संपर्कातील आणखी व्यक्तींचा शोध घेतल्या जात आहे.

शहरात दोन दिवसांत तीन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असतांनाच सुरुवातीचे ४ रुग्ण कोरोनमुक्त झाल्याने त्यांच्यात समाधान पाहायला मिळत आहे.यवतमाळ येथे उपचार घेत असलेली आणखी एक महिला आज १० जुलैला कोरोना मुक्त झाली असून तिला रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. वणी शहरातील आनंद नगर परिसरातील रशिया येथे एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेला विद्यार्थी शहरात परत येत असतांना मुंबई विमानतळावर त्याला कोरोना सदृश्य लक्षणे जाणवू लागल्याने तो यवतमाळ येथे गेला असता त्याची कोरोना तपासणी करण्यात आली. आज १० जुलैला त्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून यवतमाळ येथे त्याच्यावर उपचार सुरु आहे. शिक्षणाकरिता विदेशात असलेला सदर तरुण शहरात न येताच यवतमाळ येथे तपासणी करीता दाखल झाल्याने शहरात भीती बाळगण्यासारखे कोणतेही कारण नसल्याचे सांगण्यात आले आहे. यवतमाळ येथे काही दिवस क्वारंटाईन ठेवल्यानंतर त्याची अँटीजण कोरोना चाचणी करण्यात आली. आज त्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच सेवाग्राम येथे उपचारासाठी गेलेल्या वणी येथील ६५ वर्षीय महिलेचाही कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजले असून शहर प्रशासनाकडून मात्र अद्याप यासंदर्भात कोणतीही माहिती मिळालेली नाही. वर्धा जिल्हा वृत्त पत्रातून मिळालेल्या माहितीनुसार ८ जुलैला सेवाग्राम येथे उपचाराकरिता भर्ती असलेली वणी येथील ६५ वर्षीय महिला कोरोना बाधित निघाली असून तिच्यावर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरु आहे. या दोन पॉझिटिव्ह रुग्णांची बेरीज केल्यास शहरातील कोरोना बाधितांचा आकडा १४ वर जात असला तरी विदेशातील तरुण शहरात परतला नसून सेवाग्राम येथील पॉझिटिव्ह महिलेच्या अहवालाला प्रशासनाचा दुजोरा मिळालेला नाही. शहरात १२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद असून ५ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ७ वर आला असून परजिल्ह्यात पॉझिटिव्ह निघालेल्या व्यक्तींना पकडून शहरातील कोरोना बाधितांचा आकडा १४ होत असून ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण नऊ झाले आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share