WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी शहरातील आणखी एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह; रुग्ण संख्या झाली वीस!

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :- शहरात कोरोना बाधितांचा आकडा वाढतच चालला असून आज आणखी एका महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 20 झाली आहे. सदर महिला काल पॉझिटीव्ह आढळलेल्या वृध्द व्यक्तीची जवळची नातेवाईक असल्याचे समजते. तेलीफैल परिसरातील बफर झोन मधिल एका 70 वर्षीय व्यक्तिचा काल रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर आज त्याच्या कुटुंबातीलच एका महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. काल कोविड केयर सेंटर मधे हलविलेल्या 26 व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली त्यात 25 व्यक्ती निगेटिव्ह तर एका महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. 11 रुग्ण कोरोनातून पुर्णपणे बरे झाले असून 9 ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्नांवर उपचार सुरू आहेत. कोरोना बाधित महिलेला कोविड केंद्रातून यवतमाळला हलविण्यात आले आहे.त्या महिलेच्या सम्पर्कातील व्यक्तींचा युध्दपातळीवर शोध घेतल्या जात आहे.
दिवसागणीक कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने शहरात कोरोनाचा विळखा घट्ट होत असल्याचे निदर्शनास येत आहे. कोरोनाच्या संक्रमणची गती वाढली असून या विषाणूची लागण होण्याचे प्रमाणही वाढल्याने कोरोना बाधितांचा आकडा फुगत चालला आहे. कोरोना सन्सर्गावर प्रतिबंध लावण्याकरिता कठोर उपाययोजनांची आवश्यकक्ता असून त्याचे नियोजन करण्याकरिता स्थानिक लोकप्रतिनिधींनी परत एकदा सुज्ञ नागरिकांची बैठक बोलाऊन या वाढत्या कोरोनाच्या संकटावर गांभीर्याने चर्चा घडऊन आणन्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. अन्यथा शहरात कोरोनाच्या साखळ्या अशाच वाढत राहतील व एकापासुन दुसर्याला लागण होण्याचे प्रमाणही वाढत राहील. प्रशासन कोरोनावर नियंत्रण मिळविण्याकरिता शर्तीचे प्रयत्न करित आहे पण जनतेचे योग्य सहकार्य मिळत नसल्याने कोरोनाला भुई सपाट करण्याचे प्रयत्न फसत आहे. शहरातील वाढती वर्दळ व त्यातल्यात्यात विनाकारण फिरणार्यांची संख्या अवाजवी असल्याने कोरोनाचे संक्रमण रोखणे कठिण होत आहे. कोरोनावर पुर्णपणे नियंत्रण मिळविण्या करिता आधी वर्दळीवर नियंत्रण मिळविने आवश्यक आहे. त्याकरिता आधी शहरवासीयांचा एकमेकांशी अकारण येणारा सम्पर्क तुटला पाहिजे त्यानंतरच कोरोनाचीही साखळी तुटल्या शिवाय राहणार नाही.
एकूण पोसिटीव्ह व्यक्ती 20
कोरोना मुक्त - 11
ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह व्यक्ती - 9

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share