शहरातील आणखी दोन व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या झाली २६



प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरात मागिल दोन दिवसात 81 व्यक्तींच्या नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने कोरोनावर नियंत्रण मिळविण्यत यश आल्याचे वाटत असतांनाच आज आणखी दोन व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने प्रशासन चिंतेत आले आहे. तेली फैल परिसरातील रोडच्या दुसर्या बाजुला राहणारे दोन व्यक्ती आज पॉझिटीव्ह निघाल्याने कोरोना बाधित रुग्णांची संख्या 26 झाली असून ऐक्टिव पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 8 झाली आहे. 23 जुलैला तेली फैलतीलच एका युवकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता.त्यानंतर आज तिन दिवसानंतर तेलीफैलातीलच दोन व्यक्ती पॉझिटीव्ह आल्याने तेलीफैल परिसर कोरोना संक्रमणचे केंद्रबिंदू बनला आहे. या परिसरात सतत पॉझिटीव्ह रुग्णा आढळत असल्याने येथील नागरिकांमधे चांगलीच भिती निर्मान झाली असून प्रशासनाचीही चिंता वाढली आहे. पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या कमी झाल्याने व 81 नमुन्यांचा अहवाल निगेटीव्ह आल्याने कोरोनाचे संक्रमण निस्तेज झाल्याचे वाटत असतांनाच आज शहरात आणखी दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामूळे आणखी एकदा शहरात कोरोनाने दहशत निर्मान केली आहे.