पैनगंगा खदानीतील सुरक्षा रक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या
प्रशांत चंदनखेडे वणी :-
वेकोलिच्या पैनगंगा खदानीतील सुरक्षा रक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली असून या घटनेमुळे पैनगंगा खदानीच्या व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. रात्रपाळीत खदानीमध्ये कर्तव्यावर आलेल्या राकेश बेलावार या सुरक्षा रक्षकाचा चेकपोस्ट पासून एक किमी अंतरावरावरील पोलीसांकरिता तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या शेडमध्ये दुपट्ट्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खदान परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह आढळलेल्या जागेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता पाठविण्यात आला आहे.
पैनगंगा खदानीत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीला असलेला अंदाजन २५ वर्षे वयोगटातील राकेश बेलावार हा तरुण मुळचा घुगुस येथील रहिवासी असून सध्या तो साखऱ्याला किरायाची रूम करून राहत असल्याचे समजते. तीन महिन्यानंतर ड्युटीवर परतलेल्या राकेशची पोलिसांची चौकी असलेल्या स्पॉटवर ड्युटी लावण्यात आली होती. याठिकाणी दिवसाला पोलीस बंदोबस्ताकरिता तैनात असतात तर रात्री येथे पोलिसांची उपस्थिती नसते. रात्री या स्पॉटवर खदानीतील सुरक्षा रक्षकाची ड्युटी लावण्यात येत असल्याने याठिकाणी सुरक्षा रक्षक एकटाच तैनात असतो. त्यामुळे त्याच्या आत्महत्येची वार्ता पहाटेला लोकांच्या कानावर आली. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस यामागील कारणाचा शोध घेत आहे. रात्रपाळीची ड्युटी असल्याने कर्तव्यावर आलेल्या राकेशचा पहाटे गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खदान परिसरात चांगलीच खळबळ निर्माण झाली. तरुण व्यक्तीच्या अशा या अकाली जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस पुढील तपस करीत आहे.