माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल जाहीर, जिल्ह्याचा निकाल ९३.३७ टक्के तर तालुक्याची टक्केवारी ९३.६१ एवढी आहे !
प्रशांत चंदनखेडे वणी :-
विध्यार्थी व पालकांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर माध्यमिक शालांत परीक्षा एसएससी बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून यवतमाळ जिल्ह्याचा निकाल ९३.३७ टक्के लागला आहे. जिल्ह्यात एकूण ४४०९४ विध्यार्थ्यानी परीक्षेकरिता नोंदणी केली होती त्यापैकी ४३७०५ विध्यार्थ्यानी परीक्षा दिली त्यात ४०९६९ विध्यार्थी उत्तीर्ण झाले असून १०६५५ विध्यार्थी प्राविण्य श्रेणीत आले आहेत. तालुक्याचा निकालही उत्तम लागला असून विद्यार्थ्यांवर गुणांची बरसात झाली आहे. वणी तालुक्याचा निकाल ९३.६१ टक्के लागला आहे. तालुक्यातून २६१४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते तर २४४७ विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. वणी तालुक्यातील ११ विद्यालयांचा निकाल पूर्ण १०० टक्के लागला आहे. तर ६०४ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. १०० टक्के निकाल लागलेल्या शाळांमध्ये आदर्श हायस्कुल शिंदोला, तुकडोजी महाराज हायस्कुल भालर, भास्करराव ताजने विद्यालय कळमना, राष्ट्रीय विद्यालय बोर्डा, वणी पब्लिक स्कुल वणी, जगन्नाथबाबा विद्यालय वंजारी, स्व. के.एन. राव कातकडे माध्यमिक विद्यालय चिखलगाव, साईकृपा माध्यमिक विद्यालय मुरधोनी, श्री जगन्नाथ महाराज विद्यालय वणी, गव्हर्नमेंट एससी बॉईज रेसिडेन्शियल स्कुल परसोडा, न्यू व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कुल वणी या शाळांचा समावेश आहे.
तालुक्यातील बाकी विद्यालयांनीही उत्तम कामगिरी केली असून त्यांच्या निकालांची टक्केवारीही अतिशय चांगली आहे. तालुक्यातील बाकी विद्यालयाची टक्केवारी याप्रमाणे आहे, न्यू इंग्लिश हायस्कुल पुनवट (९८.५०), शासकीय माध्यमिक स्कुल (७३.५२), शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय वणी (९३.९०), आदर्श विद्यालय वणी (७७.७७), जनता माध्यमिक विद्यालय वणी (९६.८९), आदर्श हायस्कुल घोन्सा (९७.०८), झेड पी हायस्कुल कुरई (९३.५४), नवभारत हायस्कुल उकनी (८९.२८), आदर्श हायस्कुल साखरा (कोलगाव) (९२.००), विवेकानंद विद्यालय नेरड (९१.४८), विवेकानंद विद्यालय वणी (८८.२९), श्री गुरुदेव विद्यालय शिरपूर (९४.९१), पंचशील हायस्कुल नांदेपेरा (९३.८५), नालंदा विद्यालय वेळाबाई (८७.१४), राष्ट्रीय विद्यालय राजूर (९३.२२), विवेकानंद विद्यालय कायर (८६.६६), बालाजी माध्यमिक विद्यालय सावरला (९२.३०), लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कुल (९९.३१), श्रीमती नूसाबाई चोपणे विद्यालय वणी (८८.६७), आदर्श हायस्कुल साखरा दरा (९४.७३), लोकप्रिय विद्यालय पेटूर (९४.७३), मल्टीपरपोज ग्रामीण विकास विद्यालय ब्राह्मणी (९३.३३), जनता विद्यालय मारेगाव (कोरंबी) (९८.११), ग्रामीण विद्यालय परमडोह(चिखली) (९१.६६), गिरिजाबाई माध्यमिक विद्यालय मंदर (९३.१०), विठ्ठल पाटील माधवकर विद्यालय तेजापूर (९६.६६), राजश्री शाहू महाराज हिंदी विद्यालय वणी (८६.११), सरस्वती माध्यमिक विद्या मंदिर मोहोर्ली (९८.११), लक्ष्मीबाई राजगडकर माध्यमिक स्कुल शिरपूर (८०.६४), स्व. एस.पी. पिंपळकर माध्यमिक विद्यालय नायगाव (६६.६६), संताजी इंग्लिश मिडीयम स्कुल वणी (९६.५५). तालुक्याचा एकूणच निकाल उत्तम लागला असून विद्यार्थ्यांची गुण टक्केवारीही प्रशंसनीय आहे. अमरावती विभागात मुलांपेक्षा मुलींनीच बाजी मारली असून मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी मुलांपेक्षा जास्त आहे. अमरावती विभागाचा निकाल ९५.१४ टक्के लागला असून ९३.७२ टक्के मुले तर ९६.७६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. अमरावती विभागात एकूण १ लाख ६७ हजार ४५५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून १ लाख ५९ हजार ३१३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ८९४७८ विद्यर्थी तर ७७९७७ विद्यार्थिनींचा समावेश आहे. यामधून ८३८५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर ७५४५४ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ३ टक्क्यांनी जास्त आहे. एकूणच विद्यालयाचा निकाल हा समाधानकारक असून प्रथम श्रेणीमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही यंदा बऱ्यापैकी आहे.