WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कोरपना हेटी मार्गावर भिषण अपघात....12 झंनाचा मृत्यु, 2 गंभीर, वणीतील नागरिकांचा समावेश...

Image

सुरज चाटे वणी :- चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्या नजिक असलेल्या हेटी या गावाजवळ एका ट्रॅक ने टाटा मॅजिक MH 29 8582 ला जोरदार धडक दिल्याने, हेटी वरून येत असलेल्या मॅजिक मधील 12 जणांचा मृत्यू झाला असून, 2 गंभीर आहे. ही घटना दिनांक 8 ला रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली आहे. Image

वणी- कोरपना - हेटी मार्ग हा नेहमीचा वर्दळीचा मार्ग समजल्या जाते, त्यामुळे त्या मार्गाने सारख्या ट्रक तथा आदी जड वाहनांची नेहमीच वर्दळ सुरू असते, दिनांक 8 ला वणी लालगुडा येथील युवक सुजित ठवरे टाटा मॅजिक घेऊन मजूर आणण्याकरिता कोरपना तालुक्यात हेटीच्या पलीकडे गेला असल्याने तिथून तो मजूर घेऊन येत असताना रात्री 9 वाजताच्या दरम्यान अचानक तंबाळी च्या जवळ समोरून येणाऱ्या ट्रॅक चे नियंत्रण सुटून टाटा मॅजिक वर ट्रक धडकल्याने 12 जणांचा यात मृत्यू झाला असून, 2 गंभीर जखमी आहे. गंभीर जखमी मध्ये 2 वर्षाचा बालक व गोलू नामक युवक बचावला असून तो सुद्धा गंभीर असल्याचे बोलल्या जात आहे, जखमींवर चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Image

समोरून येणारा ट्रक हा गिट्टी क्रेशरचा असल्याचे बोलल्या जात असून, अपघात समयी ट्रक हा त्याचा कंडक्टर हा चालवीत असल्याची चर्चा होती, तर, ट्रक चालक हा त्याच्या बाजूला बसलेला असल्याचे बोलल्या जात आहे, परंतु त्याच्या एका चुकीमुळे 12 जणांना आपले प्राण गमवावे लागले. काही नागरिक लालगुडा वणी येथील रहिवासी असून तर खळबळा परिसर वणी येथील 5 नागरिक असल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळे यांच्या वर काळाचा घाला झाला असल्याने ही एक मोठी शोककळा घडली असून या घटनेने सर्वत्र हळहळच व्यक्त होत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share