WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

२२ वर्षीय युवकाची आत्महत्या, मार्डी येथील घटना

Image

मार्डी - मारेगाव तालुक्यातील मार्डी येथील एका २२ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली. दि. २ ऑगस्ट रोजी दुपारी ५ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली असून, शुभम बंडू भासपाले (वय २२) असे मृतकाचे नाव आहे. सदर घटनेने मार्डी परिसरात शोककळा पसरली.

सूत्रांच्या माहिती नुसार मृतक शुभम हा घरीच होता व शुभम चे आई वडील शेतामध्ये गेले होते. फिर्यादी मृतकाचा चुलत भाऊ अविनाश चंदू भासपाले हा सुद्धा घरीच होता. दि. २ ऑगस्ट २०२० दुपारी ५ वाजताचे सुमारास मित्रांनी त्याला घराच्या बाहेरून आवाज दिला. मात्र त्यांना कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शुभम च्या मित्रांनी फिर्यादी अविनाश भासपालेसह शुभम ला पुन्हा आवाज दिला. परंतु शुभम प्रतिसाद देत नसल्या चे लक्ष्यात येताच उपस्थितांनी खिडकीतून बघितले असता, शुभम चा मृतदेह घरातील सिलिंग फॅनला लटकलेला आढळून आला. आज मैत्री दिनाचे औचित्य असताना शुभम ने या दिनी आपली जीवन यात्रा संपवल्याने मित्र परिवार दुखावला असून हळहळ व्यक्त होत आहे. मृतकाच्या आत्महत्तेचे कारण अद्याप कळू शकले नाही. सदर घटनेचा तपास पो.नि. जगदीश मंडलवार यांचे मार्गदर्शनाखाली बिट जमादार सुरेंद्र टोंगे करित आहे.

संपादन - कुमार अमोल

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.