WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

विनामास्क रस्त्यांवरून फिरणाऱ्यांवर पोलिसांनी केली दंडात्मक कार्यवाही

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहर व तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असतांना नागरिक मात्र बेजबाबदारपणे वागतांना दिसत आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरतांना मास्क लावणे बंधनकारक असतांना देखील विनामास्क शहरात फिरून स्वतःच्या व इतरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना पोलिसांनी आज चांगलीच अद्दल घडवली असून शहरात तोंडाला मास्क न लावता फिरणाऱ्यांवर पोलिसांनी दंडात्मक कार्यवाहीचा बडगा उगारल्याने नागरिक सैरभैर होतांना दिसले.

शहर व तालुक्यातून हद्दपार होण्याच्या मार्गावर असलेला कोरोना परत एकदा सक्रिय झाला असून मागील काही दिवसांत शहर व तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतीवर लागली आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतांना दिसत आहे. रुग्णांची संख्या वाढीस लागल्याने प्रशासनावरील तान वाढला असतांनाच नागरिकही बेजबाबदारपणे वागून प्रशासनाच्या अडचणी आणखीनच वाढवतांना दिसत आहेत. शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन न करता शहरात संचार करणाऱ्या नागरिकांमुळे कोरोनाचे संक्रमण वाढण्याची शक्यता असल्या कारणाने पोलिसांनी आज विनामास्क शहरात फिरणाऱ्या महाभागांवर दंडात्मक कार्यवाहीचा बडगा उगारल्याने विनामास्क शहरात फिरणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले. दुचाकी अथवा चारचाकी वाहनाने मास्क न लावता रस्त्याने जाणाऱ्यांची पोलिसांनी वाट रोखल्याने त्यांची चांगलीच त्रेधातिरपीट होतांना दिसली. चेहऱ्याला मास्क न लावता वाहनाने जात असतांना वाटेत पोलीस उभे दिसताच आड मार्गाने नागरिक सैरावैरा पळतांना दिसत होते. विनामास्क शहरात फिरणाऱ्यांवर पोलिसांनी दंडात्मक कार्यवाही केल्याने कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे आज चांगलेच धाबे दणाणले होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share