WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शहरात शांतता समितीच्या सभेत सार्वजनिक उत्सव साजरे न करण्याच्या अप्पर पोलीस अधीक्षकांच्या सूचना !

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन लागु असतांना येणारे सार्वजनिक उस्तव गर्दी न करता घरातच व अगदी सध्या पद्धतीने साजरे करण्याच्या सूचना अप्पर पोलिस जिल्हाधिक्षक नुरुल हसन यांनी शहरातील वसंत जिनिंग सभागृहात आयोजित शांतता समितीच्या सभेत उपस्थित सर्व गणेशोस्तव मंडळाच्या सभासदांना दिल्या. तसेच येणारे गणेशोस्तव, मोहरम व् दुर्गा उस्तव शांततेत व घरातच साधेपनाने साजरे करण्यास सर्वांनीच सहकार्य करण्याचे आव्हानही नुरुल हसन यांनी केले. शांतता समितीच्या वतीने आयोजित या सभेला नगराध्यक्ष तारेन्द्र बोर्डे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक, ठाणेदार वैभव जाधव, शिरपुर पोलिस स्टेशनचे ठाणेदार अनिल राउत, तसेच शांतता समितीचे पदाधिकारी, राजकीय पदाधिकारी, सामाजिक प्रतिनिधी व् गणेश उस्तव मंडळाचे सभासद उपस्थित होते.

कोरोनाच्या या संकट काळाचा एकजुटीने सामना करत असतांना या काळात नागरिकांच्या आरोग्याचा सर्व प्रथम विचार करण्यात आला. कोरोना विषानुची एकापासून दुसऱ्याला लागन होऊ नये याकरिता सार्वजनिक उत्सवांवर बंदी घालण्यात आली. पाच पेक्षा जास्त नागरिक एकत्र येऊन कोणतेही सण उत्सव साजरे करू नये या शासनाच्या गाईडलाईन नुसार गणेश उत्सव मंडळांनी सार्वजनिक गणेश उत्सव साजरा न करता घरोघरीच गणेश मूर्तींची स्थापना करून अगदी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी उपस्थित मंडळाच्या सभासदांना देतांनांच सर्वांनी कुठेही गर्दी जमणार नाही याची दक्षता घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आव्हानही केले. १९१२ नंतर १०० वर्षांनी अशाप्रकारच्या जीवघेण्या संसर्गजन्य आजाराची साथ संपूर्ण देशात पसरली आहे. या आजाराचे रुग्ण वाढतच असून कित्येकांचे या आजाराने बळी घेतले आहे. सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव साजरा केल्याने नागरिकांची झुंबड निर्माण होऊन, त्यामुळे कोरोना संक्रमणास चालना मिळू शकते. मंडळातील एकही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास संपूर्ण गणेश मंडळाला क्वारंटाईन करण्याची वेळ येईल. तसेच पॉझिटिव्ह आढळल्यांना आयसोलेशन मध्ये जावे लागेल. तेंव्हा लोकमान्य टिळकांचा आदर्श घेऊन त्यांनी ज्याप्रमाणे इंग्रजांना लोकसहभागातून हरविले होते. तसेच आपण सार्वजनिक उत्सव टाळून कोरोनाला हरवायचे आहे. जे गणेश मंडळ या कोरोना काळात सार्वजनिक गणेश उत्सवाचे आयोजन टाळून साध्या पद्धतीने गणेश उत्सव साजरा करेल त्या मंडळांना प्रशासनातर्फे सम्मानित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. गणेशोत्सवाच्या वर्गणीतून गोरगरिबांना मदत, रक्तदान शिबीर, सॅनिटायझर व मास्क वितरण या प्रकारचे उपक्रम राबविण्याचे सूतोवाचही त्यांनी केले. पुढच्या वर्षी गणेशोत्सव थाटात साजरा करा, हवे तर पुढच्या वर्ष्याचीही पोलीस संमती आताच घेऊन जा, पण यावेळी प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती वजा आव्हान अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी यावेळी केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी कोरोना महामारीची तीव्रता लक्षात घेता ग्रामीण व शहरातीलही गणेश मंडळांची संमती करीता जास्त अर्जे आली नसल्याचे सांगितले. शिरपूरचे ठाणेदार राऊत यांनी बाबापुर येथील सार्वजनिक गणेशोत्सव अगदी सध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय मंडळाने घेतला असल्याचे सांगितले. याठिकाणी दरवर्षी २५ हजार लोकांचा महाप्रसादाचा कार्यक्रम व्हायचा. तसेच सात आठ पोलीस बंदोबस्ता करिता असायचे, पण मंडळाच्या या निर्णयाने प्रशासनावरील तान कमी झाला आहे. शांतता समितीच्या पदाधिकारी व उपस्थित राजकीय सामाजिक पुढाऱ्यांनीही गणेशोत्सव साध्याच पद्धतीने साजरा करण्यावर भर दिला. या सभेत शहरातील इतरही समस्या व महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share